नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ३ ये अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून सापळा रचून जुना बगडगंज चौक जवळ, क्लासीक मोबाईल शॉपीसमोर मिळालेल्या वर्णनाच्या स्लेंडर मोटारसायकल क. एम. एच. ४९ बि.एक्स. १२५१ वरील ईसमास ताब्यात घेतले. त्याचे गाडीचे सिटखाली एक लोखंडी तलवार किंमती अंदाजे १,०००/-रु. ची मिळून आली. आरोपीची सखोल विचारपूस करून अभिलेख तपासला असता, त्याने पोलीस ठाणे सदर हद्दीतुन ए.सी. चोरीचा गुन्हा केल्याचे व त्या गुन्हयामध्ये पाहीजे आरोपी असत्याचे निष्यण्ण झाले आरोपीचे ताब्यातुन तलवार व मोटार सायकल असा एकुण किमती ७१,०००/-रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी हा कोणतातरी दखलपात्र गुन्हा करण्याचे उद्देशाने शस्त्रासह समक्ष मिळून आल्याने तसेच, त्याने मा सह पोलीस आयुक्त साहेब, नागपुर शहर यांचे मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने, पोलीस ठाणे नंदनवन येथे आरोपीविरूष्द कलम ४, २५ भा.ह.का., सहकलम १३५ म.पो.का. अन्वये गुन्हा होत असल्याने गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. आरोपीस मुद्देमालासह पुढील तपासकामी नंदनवन पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांचे मार्गदर्शनाखाली, योनि, मुकुंद ठाकरे, सफी. ईश्वर खोरडे, पोहवा अमोल जासूद, मुकेश राऊत, अनुप तायवाडे, नापोअं. संतोष चौधरी व अनिल बोटरे यांनी केली.