प्रशासनाविषयी जनतेमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करा –  डॉ. नितीन करीर

विभागीय महसूल परिषदेचा समारोप

नागपूर, दि. 26 : सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविताना महसूल अधिकाऱ्यांनी कायम सकारात्मक भूमिका ठेवावी. तसेच प्रशासनाविषयी आपलेपणाची भावना निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, असे  प्रतिपादन महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी केले.

वनामती येथे आयोजित दोन दिवसीय विभागीय महसूल परिषदेच्या समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. करीर बोलत होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. नितीन करीर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे महसूल अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. महसूल परिषदेत विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, जिल्हाधिकारी आर. विमला (नागपूर), प्रेरणा देशभ्रतार (वर्धा), अजय गुल्हाने (चंद्रपूर), संदीप कदम (भंडारा), संजय मीना (गडचिरोली) तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महसूल विभाग अधिक गतिमान करण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करत असतानाच महसूल विभागाशी संबंधित सर्व नियम व कायद्यांची माहिती असणे अत्यंत आवश्यक असल्याचे डॉ. करीर म्हणाले. तसेच शासनस्तरावर नियम व कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात विविध निर्णय घेतले जातात. या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना अधिकाऱ्यांनी अधिक सतर्क राहून प्रशासकीय निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करताना जनतेला योजनांबद्दल माहिती द्यावी. यासंदर्भात असणाऱ्या शंका दूर करून लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी महसूल विभागाने पुढाकार घेवून काम करण्याची अपेक्षाही अपर मुख्य सचिव डॉ. करीर यांनी यावेळी व्यक्त केली.

विविध कायदे व नियमांची अंमलबजावणी करताना सर्वांना समान न्याय देण्याचे तत्व पाळणे अपेक्षित असल्याचे सांगताना माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर म्हणाले की, कोणावरही अन्याय होवू नये, यासाठी महसूल अधिकाऱ्यांना नियमांचे सखोल ज्ञान आवश्यक आहे. निर्णय घेताना कायद्याच्या कसोटीवरच असावेत. यामध्ये कोणताही गोंधळ नसावा. महसूल परिषदेसारख्या उपक्रमांतून कायदे व नियमांची माहिती सुलभपणे उपलब्ध होत असल्याने प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शकपणे करणे शक्य होते. सामान्य नागरिकांच्या व्यथा जाणून घेवून त्या सोडविण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महसूल अधिकाऱ्यांनी अर्ध न्यायिक अथवा इतर कोणतेही प्रशासकीय काम करताना प्रामाणिक हेतूने निर्णय घ्यावेत. तसेच कायदे, नियमांमध्ये होणारे बदल समजून घेवून प्रशासकीय कामकाज करणे गरजेचे आहे. त्यामुळे या कायद्यांची गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी होण्यास मदत होईल, असे विभागीय आयुक्त श्रीमती लवंगारे-वर्मा यावेळी म्हणाल्या.

महसूल परिषदेमुळे महत्वाचे कायदे आणि नियमांची पुन्हा उजळणी होण्यास मदत झाल्याचे नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयात सहसचिव पदावर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची नियुक्ती झाल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

महसूल प्रशासनातील उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार या संवर्गातील अधिकाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महसूल उपायुक्त मिलिंदकुमार साळवे यांनी, तर सूत्रसंचालन आशा पठाण यांनी केले. या परिषदेत नागपूर विभागातील महसूल अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

Ministry of Defence approves 21 new Sainik Schools in partnership mode from academic year 2022-2023

Sun Mar 27 , 2022
New Delhi  – Ministry of Defence (MoD) has approved setting up of 21 new Sainik Schools, in partnership with NGOs/private schools/State Governments. These schools will be set up in the initial round of the Government’s initiative of setting up of 100 new Sainik schools across the country in partnership mode. They will be distinct from the existing Sainik Schools. The […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com