मुंबईत आरोग्य आपल्या दारी मोहीम एप्रिलपासून मुंबईत झीरो प्रिस्किप्शन पॉलिसी

– मुंबईकरांना आरोग्य उपचारावर खर्च करावा लागणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

– मुख्यमंत्र्यांची आपला दवाखान्याला अचानक भेट

मुंबई :- मुंबईतील वरळी भागातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी साडे अकराच्या सुमारास अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी दवाखान्याची पाहणी करतानाच तपासणीसाठी आलेल्या रुग्णांशी देखील त्यांनी संवाद साधला.

मुंबईकरांच्या आरोग्य उपचारावरील खर्च कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आरोग्य आपल्या दारी मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेतून घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. एप्रिल पासून झिरो प्रिस्क्रीप्शन पॉलिसी देखील सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

वरळीतील अभियांत्रिकी संकुलातील आपला दवाखान्यात मुख्यमंत्री यांचे अचानक आगमन झाले. त्यांनी दवाखान्यातील, स्टोर रूम, औषध कक्ष, तपासणी खोली, स्वच्छ्ता गृह यांची पाहणी केली. यावेळी तेथे तपासणीसाठी आलेल्या काही ज्येष्ठ नागरिकांशी मुख्यमंत्री यांनी संवाद साधत ‘आपला दवाखाना’ विषयी अनुभव विचारला. रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबईकरांना उपचारासाठी घराजवळच सोय व्हावी या संकल्पनेतून आपला दवाखाना मुंबईत २२६ ठिकाणी सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत ४२ लाख नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे. याठिकाणी उपचार मोफत, कॅशलेस, पेपरलेस मिळत आहेत.

मुंबईत आरोग्य आपल्या दारी मोहिमेतून घरोघरी आरोग्य तपासणी केली जाणार आहे. झीरो प्रिस्किपशन पॉलिसी एप्रिल पासून सुरू होणार आहे. त्यासाठी १५०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

यावेळी मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त वेलारासू, डॉ. सुधाकर शिंदे आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महायुती’कडून घटक पक्षांकडे दुर्लक्ष - जयदीप कवाडे

Thu Mar 7 , 2024
 रामटेक-लातूर लोकसभेची जागा ‘पीरिपा’ला द्या  राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडेंची आग्रही मागणी मुंबई/नागपुर :- पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या नेतृत्वात महायुती येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत 400 हून अधिक जागा जिंकणार आहे. उत्तरप्रदेशानंतर सर्वात जास्त जागा असलेल्या महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागां हे महायुती सरकार स्थापन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाविणार आहे. राज्यात शिवसेना प्रमुख तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे जेष्ठ नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com