नागपूर :- महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, युनिसेफ, कम्युटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट (CCDT), होप फॉर चिल्ड्रन इंडिया, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित “बालस्नेही” पुरस्कार वितरण सोहळ्यात आंचल गोयल यांना “बालस्नेही” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, नागपुरात देखील आंचल गोयल यांचा सत्कार करण्यात आला.
राज्यात बालकांच्या सर्वांगीण विकास बाल हक्क संरक्षण त्यांची सुरक्षा,आरोग्य याकरिता तसेच बालकांच्या हक्कासाठी उत्कृष्ट काम केल्याबद्दल उत्कृष्ट जिल्हाधिकारी या श्रेणीत परभणीच्या तत्कालीन जिल्हाधिकारी व नागपूर महानगरपालिकेच्या विद्यमान अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांना मान्यवरांच्या हस्ते बालस्नेही पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच नागपूर येथे महिला आयोग सदस्य आभा पांडे आणि विभागीय महिला व बाल विकास उपायुक्त अर्पणा कोल्हे यांच्या उपस्थितीत आंचल गोयल यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी जिला महिला व बाल विकास अधिकारी आरती मानकर विधी सल्लागार अधि. धनकुटे, जिला समन्वयक अनिल रेवतकर, सरंक्षण अधिकारी माहुरे उपस्थित होते.
मुंबईतील कार्यक्रमात नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष अॅड. सुशीबेन शहा, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, विशेष पोलिस महानिरीक्षक (महिला व अत्याचार) दीपक पांडे, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य सचिव शिवराज पाटील, बचपन बचाव आंदोलनाच्या संचालक संपुर्ण बेहरा, युनिसेफच्या मुख्य अधिकारी राजलक्ष्मी नायर, होप फोर चिल्ड्रन इंडियाच्या कॅरोलिनी व्हॅल्टन, महिला व बालविकास उपायुक्त राहुल मोरे उपस्थित होते.
परभणी जिल्हात बालविवाहचा प्रमाण सर्वाधिक 46 टक्के असल्यामुळे गोयल यांना बालविवाह मुक्त परभणी या मोहिमेची सुरवात केली होती. एक वर्षात तब्बल दोनशे बालविवाह थांबविण्यात यश प्राप्त झाला होता. जिल्हाधिकारी असतांना त्यांनी प्रत्येक तालुक्यातील किशोर वयीन मुलींशी प्रत्येक संवाद साधुन कायदेतील तरतुदीबाबद जनजागृती सुद्धा केली होती. प्रत्येक गावात सरपंचाची अध्यक्षतेखाली ग्राम बाल संरक्षण समितीची स्थापना करण्यात आली होती. या कामाची दखल घेउन आयोगानी गोयल व परभणी जिल्हायाची संपुर्ण महिला व बाल विकास चमूला गौरवान्वित केले.