गाणारांनी जुनी पेन्शन बंद करणाऱ्या बीजेपीची आधी उमेदवारी नाकारावी मगच जुन्या पेन्शन ची टोपी घालावी – प्रा. डॉ. देवेंद्र वानखड़े
नागपूर :-आम आदमी पार्टी कडून दि. 12/01/2023 रोजी नागपूर विभागीय शिक्षक मतदार क्षेत्रात उच्चशिक्षित प्रा. डॉ देवेंद्र वानखडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. अनेक शिक्षक बांधव आणि आपच्या शेकडो कार्यकर्त्यांसह विभागीय आयुक्त कार्यालयात प्रा. डॉ. देवेंद्र वानखडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
आम आदमी पार्टीचे दिल्लीतील शिक्षण मॉडल संपूर्ण देशात आकर्षणाचे केंद्र बनले असून याच धरतीवर महाराष्ट्र विधान परिषदेत शिक्षणाचा दर्जा उंचविण्याकरिता व शिक्षकांचे प्रश्न मांडण्याकरिता डॉ देवेंद्र वानखडे यांच्यासारख्या उच्चविभूषित व्यक्तीला उमेदवारी दिलेली आहे.
यापूर्वी महाराष्ट्र सरकारने जुनी पेन्शन योजना बंद केली, शिक्षणाचे बजेट कमी केला, शाळा व कॉलेजमधील सन 2012 पासून भरती प्रक्रिया पूर्णपणे बंद केली, शाळेला मिळणारी नॉन सॅलरी ग्रँड बंद केली, बिना अनुदानित शाळा कॉलेज अनुदान पात्र असूनही अनुदान प्रक्रियेत सामील केले नाही. शिक्षण सेवक सारखी योजना आणून शिक्षण क्षेत्रात शिक्षकांचे पावित्र्य नष्ट करण्याचे काम केल्या गेले व शिक्षण सेवकांना तटपुंजी मानधन देण्यात येते. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून शाळेचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याच प्रकारे अनुदानित शाळा बंद करून स्वयं अर्थसहाय्यित शाळांना मंजुरी देण्याचे काम करण्यात येत आहे. शिक्षकांना शिक्षणाऐवजी गैर शैक्षणिक कामे जसे की निवडणूक, जनगणना, लसीकरण, सर्वेक्षण, शासकीय योजनांचा प्रसार प्रचार करण्यासारखे काम देण्यात येत आहे.
या उलट दिल्ली सरकारमध्ये अरविंद केजरीवाल यांनी शैक्षणिक क्रांती आणून जुनी पेन्शन लागू करण्यासारखे अग्रणीय काम केले आहेत. दिल्लीत वर्ल्ड क्लास शिक्षण व्यवस्था निर्माण केली व बजेटच्या 24% निधी हा केवल शिक्षण या क्षेत्रावर ती खर्च करून शैक्षणिक दर्जा उंचावण्याचे काम आम आदमी पार्टीने दिल्लीत केले आहे. शिक्षकांना व प्राचार्यांना विविध प्रकारचे देशात व परदेशात प्रशिक्षण देऊन त्यांचा विकास करण्याचे काम केले आहे. दिल्ली सरकार प्रमाणे पंजाब सरकारने देखील जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. शिक्षक मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून विधान परिषदेत पाठवल्यास दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्र विधान परिषदेत शिक्षण व्यवस्था नीट करण्यासाठी व शिक्षकांचे प्रश्न पोटतडकीने मांडण्याचे काम प्रामाणिकपणे करील असे प्रा. डॉ. देवेंद्र वानखेडे यांनी सांगितले.
हे नामांकन भरण्याच्या वेळेला प्रामुख्याने महाराष्ट्र कोषाध्यक्ष जगजीत सिंग, राज्य सहसचिव अशोक मिश्रा राष्ट्रीय परिषद सदस्य अमरीश सावरकर नागपूर संयोजक कविता सिंगल नागपूर संघटन मंत्री शंकर इंगोले नागपूर सचिव भूषण ढाकुलकर, लीगल प्रमुख राजेश भोयर, डॉ शहीद अली जाफरी, राकेश उराडे, कृतल वेलेकर, विधानसभा संयोजक रोशन डोंगरे,अजय धर्मे, लष्मीकांत दांडेकर, मनोज डफ़्रे, पीयूष आकरे, श्याम बोकडे, प्रतीक बावनकर, प्रा पी पी सोनोने, प्रा वांगळ, प्रा अरविंद जोशी, राजेश गजघाटे, संजय हेड़ाउ, प्रा. निम्जे, प्रा. नितिन चोपड़े, मोउदेकर गुरुजी, प्रा. आर वय देशमुख, डॉ जितेंद्र गुंजाटे, डॉ विजय डाखोळे, डॉ अनवाने, प्रा मनीष देशमुख, फजितराव कोरडे , विजय नंदांवर , धीरज आघाशे, प्रदीप पौनिकर, डॉ नारनवरे, सोनू फटिंग, जॉय बांगड़कर, संतोष वैद्य, प्रभात अग्रवाल, दीपक भातखोरे, बाबा मेंढे, हरीश गुरबाणी, अलका पोपटकर, पुष्प डाबरे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तित होते.