संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
कामठी :- नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीन पाणी टाकी जवळ न्यू येरखेडा येथे बिना परवाना अवैधरीत्या सुगंधी तंबाखू व खर्याची विक्री करणाऱ्या तरुणास नवीन कामठी पोलिसांनी अटक करून 50 हजार 575 रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई मंगळवार ला रात्री साडेबारा वाजता सुमारास केली नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अमित अशोक मते वय 29 राहणार टीचर कॉलनी येरखेडा हा बिना परवाना अवैधरीत्या नवीन पाणी टाकी अंगणवाडी न्यूयेरखेडा जवळ बिना परवाना अवैधरीत्या सुगंधी तंबाखू व खर्रा विकत असल्याची गुप्त माहिती नवीन कामठी पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी मंगळवारी रात्री साडेबारा वाजता सुमारास धाड मारली असता घटनास्थळावरून श्री एमएसएस हिरव्या रंगाच्या सुगंधी तंबाखू 30 किलो, करड्या रंगाचा सुगंधी तंबाखू 9 किलो ,काळ्या रंगाचे गोल्डन सफारी तंबाखू ,वजन काटा ,खर्रा घोटण्याची इलेक्ट्रॉनिक मशीन ,मोबाईल फोन एकूण 50 हजार 575 रुपयाचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला नवीन कामठी पोलीस स्टेशनला कलम 188 ,272 ,273 ,328 भादवी नुसार गुन्हा दाखल करून आरोपी अमित अशोक मते वय 29 वर्ष याला अटक केली.
वरील कारवाई पोलीस उपयुक्त श्रवण दत्त, सहाय्यक पोलीस उपायुक्त संतोष खांडेकर ,ठाणेदार प्रमोद पोरे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार ,संजय आठवले, हेडकॉन्स्टेबल विशाल मेश्राम,भूपेंद्र सनोदिया ,सुरेंद्र शेंडे नसीम अन्सारी यांच्या पथकाने केली.