• ‘असाही जेएलपीटी’चे आयोजन, तरूणाईला सहभागी होण्याचे आवाहन
• ताऊची नोरिताका, जपान काउन्सिलेट यांची राहणार प्रमुख उपस्थिती
नागपूर :- जपानचे सांस्कृतिक वैविध्य, त्याठिकाणी भारतीय तरूणाईसाठी करिअरकरिता खुली असलेली दालन यासह तेथील विविध सर्वांगिण बाबींची माहिती होण्यासाठी ‘आसाही जेएलपीटी प्रिप्रेशन क्लासेस व जेईटीएए’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ओहायो जपान’ हा मोफत कार्यक्रम तसेच विशेष कार्यशाळा 21 व 22 जानेवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत खामला स्थित सोमलवार निखालस हायस्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून सीएलएआयआर परिषदेचे उपसंचालक केंता शिमिझु व विशेष उपस्थिती म्हणून कांचन गडकरी, निशिकांत काशीकर, सोमलवार निखालस शाळेचे मुख्याध्यापक दामोदर ठोंबरे हे देखील उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.
जपानी भाषा, संस्कृती, करिअरच्या दृष्टीने मार्गदर्शन, संगित, काराओके आदींचे सादरीकरण या कार्यशाळेदरम्यान होणार आहे. कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शन म्हणून जपान येथील आंतरराष्ट्रीय शिक्षण नियोजन संस्था टोकीओचे शुईचिरो मिमुरा यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. जपानी वेषभूषा (किमोनो), खानपान विषयक माहिती, चाॅपस्टिकचा वापर, विविध खाद्यपदार्थ, भारत-जपान मैत्रिसंबंध, इत्यादी विषयांवर देखील सहभागी व्यक्तिंना मार्गदर्शन मिळणार आहेत. नागपूरकरांनी या विशेष कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, तसेच कार्यशाळा तसेच विविध उपक्रमांत सहभागी होण्याकरिता प्रारंभी नाव नोंदणी करण्यासाठी 8698888336 या क्रमांकावर संपर्क साधण्याची माहिती ‘आसाही जेएलपीटी प्रिप्रेशन क्लासेसचे मंदार सुगवेकर यांनी दिली आहे.
@ फाईल फोटो