नागपुर :- ब्रम्हपुरी वडसा येथुन लाकुड भरुन उमरेड मार्गे नागपुर रोडवर कुही फाटा शिवारात टायगर काँम्लेक्स धाब्याजवळ नादुरूस्त ट्रक ला मागुन येणा-या ट्रकने धडक मारून झालेल्या अपघातात उभ्या ट्रक चालक/मालक नंदकिशोर सावरकर याचा घटना स्थळीच मुत्यु झाल्याने कुही पोलीसानी ट्रक चालक बहादुर यादव विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आहे.
ब्रम्हपुरी वडसा येथुन लाकुड भरुन ट्रक क्र. एम एच ४९- ए टी ६५९३ चा चालक उमरेड मार्गे उमरेड ते नागपुर कापसी येथे घेवुन जात असताना कुही फाटा शिवारात टायगर काँम्लेक्स धाब्याजवळ डिझेल संप ल्याने ट्रक बंद पडल्याने सदर ट्रक मध्ये डीझेल टाकुन ट्रक चालु करण्याकरीता ट्रक खाली जावुन पंप मधील ऐअर काढीत असता मागेहुन नागपुरच्या दिशेने जाणा रा ट्रक क्र. एमएच ४०- सीडी १९११ चा चालक बहादु र धनेश्वर यादव वय ३४ राह. बाबासावजी धाब्या जव ळ उमरेड ता. उमरेड जि. नागपुर ने आपल्या ताब्याती ल ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन उभा असलेला ट्रकला मागेहुन धडक मारुन अपघात केल्या ने सदर अपघातात उभ्या ट्रक चालकाच्या डोक्याला, छातीला मानेला व दोन्ही हाताला गंभीर मार लागुन घटनास्थळीच त्याचा मुत्यु झाल्याने त्याचे मरणास कारणीभुत ठरला व ट्रक क्र.एमएच ४० – सीडी १९११ हा समोर काही अंतरावर रोडचे कडेला पलटी होवुन स्वताहा जखमी होण्यास ट्रक चालक बहादुर यादव हा अपघातास कारणीभुत ठरला आहे. सदर अपघाताच्या चौकशीअंती साक्षदार तुषार नरेद्र बोलधन रा. गुलमोह र नगर भरतवाडा रोड नागपुर यांचे बयानावरुन तसेच घटना स्थळावरील लोकांना विचारपुस अंती निस्पन्न झाल्याने यातील ट्रक क्र.एमएच ४० – सीडी १९११ चा चालक बहादुर यादव यांनी आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन लाकडांनी भरलेल्या उभ्या असलेल्या ट्रक ला मागेहुन धडक मारुन ट्रक चालक/मालक नंदकिशोर रामभाऊ सावर कर वय ४० वर्ष रा. गुलमोहर नगर भरतवाडा रोड नागपुर याचे मरणास व स्वत: जखमी होण्यास कारणी भुत ठरल्याने त्यांचे विरुध्द कुही पोलीस स्टेशन मध्ये कलम २८५, १२५ (अ), १०६ (१) भा.न्या.स. सह कलम १८४ मो.वा.का. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.