नागपूर :- नागपूर महानगरपालिका परिवहन विभाग आणि जनआक्रोश यांच्या संयुक्त विद्यमाने बस चालकांसाठी “डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग” याविषयावर गुरुवार २९ आणि शुक्रवार 30 ऑगस्ट रोजी धरमपेठ येथील ट्राफिक चिल्ड्रनस पार्क येथे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळेचे उद्घाटन गुरुवारी (ता:२९) सकाळी ११ वाजता मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते होईल. या प्रशिक्षण कार्यशाळेत एक हजाराहून अधिक आपली बस चालकांना “डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग” याविषयावर प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती जनआक्रोशचे सचिव रवींद्र कासखेडीकर यांनी दिली.