राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण 338 प्रकरणे निकाली

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

–  62 लक्ष 93 हजार 762 रुपयाची तडजोड रक्कम वसूल

कामठी :- दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने आयोजित लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. वादपूर्व व दाखल अशी एकूण 338 प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात यश आले असल्याची माहिती कामठी न्यायालयातून प्राप्त झाली.

28 सप्टेंबर ला तालुका विधी सेवा समिती कामठी अंतर्गत दिवाणी व फौजदारी न्यायालय कामठी येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालत मध्ये एकूण दोन पॅनल ठेवण्यात आले होते. ज्यामध्ये पॅनल क्र 1 मध्ये दिवाणी व फौजदारी न्यायाधीश ए आर कामत होते त्याचबरोबर पॅनल क्र 2 मध्ये न्यायाधीश एस एस जाधव होते तर पॅनल एडव्हॉकेट म्हणून एस एस गजभिये होते. या लोक अदालत मध्ये न्यायालयांतील प्रलंबित प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती.

आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयात कामठी तालुक्यातील प्रलंबित असलेले प्रकारणांपैकी 126 प्रकरणे निकाली काढण्यात आली.या प्रकरणामध्ये एकूण 13 लक्ष 54 हजार 651 रुपयांची वसुली झाली तसेच खटला पूर्व प्रकरणामध्ये वादपूर्व प्रकरणातील बँक,ग्रामपंचायत यांची एकूण 1333 प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यातील 212 प्रकरणे निकाली काढून या प्रकरणामध्ये 49 लक्ष 39 हजार 111 रुपयांची तडजोड वसुली करण्यात आली .अशी एकूण 338 प्रकरणे सामंजस्याने मिटवून लोक अदालतीमध्ये एकूण 62 लक्ष 93 हजार 762 रुपयांची वसुली करण्यात आली. या लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी कामठी तालुका वकील संघ,न्यायालयीन कर्मचारी वर्ग ,व पोलीस कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Teertha Darshan scheme aimed at bringing joy and moments of satisfaction in the lives of elderlies – Chief minister Eknath Shinde

Sat Sep 28 , 2024
Kolhapur :- Stating that elderlies in the society is our treasure since whatever efforts they took in their lives, chief minister Eknath Shinde said that their knowledge and experience is a rich legacy for us which is why it is our responsibility to bring joy and satisfaction in their lives. He said that with this feeling, the department of social […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com