–लोकांचे राज्य आणायचे असेल तर कांग्रेस पक्ष सत्तेत आला पाहिजे-माजी जी प अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर
कामठी ता प्र 14:-15 ऑगस्ट ला होणाऱ्या ध्वजारोहणाचा वाद हा सोशल मीडियावर चांगलाच गाजल्याने अंतर्गत गटबाजी असल्याच्या चर्चेला उधाण आले होते.तेव्हा ही वाद प्रतिवादात्मक परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टिकोनातुन पक्षश्रेष्ठींनी पुढाकार घेत पदाधिकारी कार्यकर्त्यांची समनव्य बैठक घेत वाद संपुष्टात आणला परिणामी आज सायंकाळी दरम्यान माजी जी प अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या बैठकीत अंतर्गत नाराजगी दूर सारून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्याचे ठरविण्यात आले त्यातच कामठी नगर कांग्रेस कमिटी कार्यालय प्रांगणात 15 ऑगस्ट ला सकाळी 9.15वाजता कामठी शहर महिला कांग्रेस अध्यक्ष सुरेय्या बानो यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार तसेच गांधी मंच येथे नवनियुक्त कामठी शहर कांग्रेस शहराध्यक्ष रमेश दुबे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्याचे ठरविण्यात आले यावर सर्वानुमते सहमती दर्शवित आनंदमय वातावरण निर्माण होत कांग्रेस कार्यालयात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांत कुठलीही गटबाजी नसून एकजूट असल्याचा संदेश देण्यात आला.
याप्रसंगी माजी जी प अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर यांनी आपल्या मार्गदर्शनार्थ सांगितले की देशहिताचा विचार करणाऱ्या देशभक्तांचा संघटित पुकार हा काँग्रेसचा आरंभ होय. स्वातंत्र्य म्हणजेच लोकशाही आणि स्वराज्य म्हणजेच लोकराज्य हा सिध्दांत काँग्रेसने लोकांमध्ये रुजवला.
विद्यमान परिस्थितीत देशात पुन्हा लोकांचे राज्य आणायचे असेल, तर काँग्रेस पक्ष सत्तेवर आला पाहिजे आणि कांग्रेस ही एक विचारधारा आहे अशी भावना जनमानसात रुजवायची आहे .
कांग्रेस पक्षात शिस्तबद्ध व नियोजनबद्ध कार्यप्रणाली करण्याच्या दृष्टिकोनातून हम सब एक है चा नारा देण्यात आला.
याप्रसंगी माजी जिला परिषद अध्यक्ष सुरेश भोयर, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटीचे महासचिव माजी नगराध्यक्ष शकुर नागाणी, कामठी नगर परिषदचे माजी अध्यक्ष मो शाहजहां शफाअत, कामठी तालुका कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष नानाभाऊ कंभाले, माजी नगराध्यक्ष गुडु मानवटकर,माजी नगराध्यक्ष निरज यादव,अहफाज अहमद, कृष्णा यादव,शेख इरशाद, धीरज यादव,माजी नगरसेवक निरज लोणारे, तुषार दावानी, राजकुमार गेडाम,युगचंद छललानी,राशीद अंसारी,सलामत अली, सुरैया बानो, लक्ष्मण संगेवार,
नितेशकुमार यादव, मोहम्मद सुल्तान,आशिष मेश्राम,सलाम अंसारी, ममता कांबळे, कुसुमताई खोब्रागडे, इशरत आरा, राजेश कांबळे, प्रकाश लाईनपांडे, शंकर वाडीभस्मे ,व समस्त कार्यकर्ता उपस्थित होते.