साकोलीत नाटयगृह उभारणार-गोसेखुर्द जलपर्यटन प्रकल्पामुळे जिल्हयाच्या विकासाला चालना – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भंडारा :- स्थानिक कलावंतांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळण्यासाठी साकोली येथे शासनातर्फे नाट्यगृह उभारण्यात येईल,अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज साकोली येथील खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या कार्यक्रमात केली.

यावेळी व्यासपीठावर भंडारा -गोंदीया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे ,माजी राज्यमंत्री डॉ.परिणय फुके, तिरोडयाचे आमदार विजय रहांगडाले,जिल्हाधिकारी भंडारा योगेश कुंभेजकर ,जिल्हाधिकारी गोंदिया चिन्मय गोतमारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

भंडारा-गोंदिया क्षेत्रामध्ये झाडीपटटीतील दंडार, खडी गंमत, मंडई, या लोककलांचा समृध्द वारसा लाभला आहे. या लोककला संवर्धनासाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव हे उत्तम व्यासपीठ असल्याचे फडणवीस म्हणाले. आदिवासी समाजाने नृत्य, कला ,गायन, नाट्य यासह झाडीपट्टीतील वैशीष्टपुर्ण लोककलेला जिवंत ठेवले आहे.

आदीवासी तरूणाईच्या याच कलागुणांना वाव मिळण्यासाठी साकोलीला नाट्यगृह असावे ,अशी अपेक्षा खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केली .त्यावर उपमुख्यमंत्री महोदयांनी लवकरच साकोलीत नाट्यगृह उभारणार असल्याचे आश्वस्त केले व जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी जागेचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

भंडारा-गोंदियाच्या विकासासाठी राज्य शासन कटीबद्ध असून साडेचारशे कोटी प्रकल्प किमतीच्या गोसेखुर्दच्या जल पर्यटन प्रकल्पालामुळे जिल्हयाच्या विकासाला चालना मिळेल. या जलपर्यटन प्रकल्पामुळे भंडारा – नागपूर जागतिक पर्यटनाच्या नकाशावर येणार आहे.यामुळे स्थानिकांना रोजगार संधी उपलब्ध होतील,असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

गोसेखुर्द प्रकल्पाचे उर्वरीत कामकाज लवकरच पूर्ण करण्यात येईल. आणि धापेवाडा बॅरेजच्या दुस-या टप्यारणचे काम ही गतीने करण्यात येणार असल्याचे श्री.फडणवीस यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी विविध योजना राज्य शासन मोठ्या प्रमाणात राबवत असून त्यामध्ये मागेल त्याला शेततळे,जन आरोग्य योजनेअंतर्गत पाच लाख रुपयेपर्यंतचे मोफत उपचार ,शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा यांचा लाभ राज्यातील जनतेला होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात भारत जागतिक पटलावर अग्रेसर आहे असल्याचे त्यांनी सांगितले.वैनगंगा- पांगोली खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे प्रास्ताविक स्वर्गीय बाबुराव मेंढे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शुभांगी मेंढे यांनी केले. प्रास्ताविकात या आयोजनामागची भूमिका त्यांनी विषद केली. माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी भंडारा-गोंदिया मध्ये असलेल्या समृद्ध कलागुणांचा वारसा पुढील पिढीकडे नेण्यासाठी अशा पद्धतीच्या कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले.

खासदार सुनील मेंढे यांनी देखील यावेळी खासदार सांस्कृतिक महोत्सवाअंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. खासदार सांस्कृतिक महोत्सवात आधी तालुकास्तरावर नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले .तालुकास्तरावरील विजेत्यांना जिल्हास्तरावर व जिल्हास्तरावरील विजेत्यांना लोकसभा स्तरावर सादरीकरण करण्यात आले. ब्रिटन गॉट टॅलेंट या स्पर्धेत चमकलेल्या मुंबईच्या सुप्रसिद्ध एक्स वन एक्स वन या डान्स ग्रुपने चित्त थरारक नृत्यविष्कार यावेळी सादर केला .तसेच स्थानिक कलावंतांनी देखील या वेळेस नृत्याविष्कार सादर केले.विजेत्या चमूंना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सरस्वती क्रेडिट इंस्टीट्यूशन रेवरल की 29वीं वार्षिक आम बैठक संपन्न हुई

Sun Oct 8 , 2023
धर्मपुरी :- सरस्वती ग्रामीण गैर-कृषि कंपनी क्रेडिट यूनियन रेवरल की 29वीं वार्षिक आम बैठक 24/09/2023 को समाज भवन रेवरल में हर्षोल्लास के साथ आयोजित की गई।अध्यक्ष और उपस्थित सदस्यों ने भगवान बाबा हनुमानजी और जुमदेवजी की तस्वीरों की पूजा की और शुरुआत की दीप प्रज्वलित कर बैठक की गयी. बैठक में अध्यक्ष कोटेश्वर मदनकर ने बताया कि संस्था की जमा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com