नवी दिल्ली :- पर्यटन मंत्रालयाने नुकतेच 01 डिसेंबर 2023 रोजी नवी दिल्लीत गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते.
भारताच्या पर्यटन परिसंस्थेच्या अफाट क्षमतांचा धांडोळा घेऊन त्यांचा लाभ घेणे हे या परिषदेचे उद्दिष्ट होते. प्रवास आणि पर्यटन क्षेत्रातील शाश्वत आणि लवचिक विकासासाठी महत्त्वपूर्ण धोरणे आणि घटक केंद्रस्थानी असलेल्या या गोलमेज परिषदेत सरकारी अधिकारी आणि उद्योग धुरिणांमध्ये ठोस विचारमंथन झाले.
नीती आयोग, युनेस्को, युनेप, डब्ल्यूटीटीसीआयआय, आययूसीएन, आयएचएमसीएल, आयरसीटीसी, पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, एफएचआरएआय आणि इंट्रेपिड ग्रुप सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांसह विविध प्रतिष्ठित संस्थांच्या प्रतिनिधींनी या परिषदेत सहभाग नोंदवला. प्रवास आणि पर्यटन उद्योग आणि शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींसह केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्रालये/विभागांच्या सहभागातून हा संवाद अधिक खुलला.
परिषदेच्या उद्दिष्टांमध्ये पर्यटन परिसंस्थेचे महत्त्वाचे घटक समाविष्ट आहेत, ज्यात प्रशासन, स्थानिक समुदाय सहभाग, कामगारांची भूमिका, आर्थिक प्रभाव, तंत्रज्ञानाचा प्रभाव, पर्यटन स्थळे, सांस्कृतिक आणि नैसर्गिक संसाधनांचे जतन, पायाभूत सुविधा आणि पर्यावरण संवर्धन यांचा समावेश आहे.
पर्यावरण, प्रवास आणि पर्यटन धोरण सक्षम करणे आणि परिस्थिती, पर्यटन व्यावसायिक आणि पायाभूत सुविधा आणि प्रवास आणि पर्यटन शाश्वतता सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित करून विविध संकल्पनात्मक सत्रांची रचना करण्यात आली.
सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध राज्यांची ओळख, रहदारी पुनर्निर्देशित करण्यासाठी डिजिटल रणनीतींचा लाभ घेणे, नकारात्मक धारणांना तोंड देण्यासाठी सामग्री तयार करणे आणि विश्वसनीय डेटा आणि बेंचमार्किंगची महत्त्वपूर्ण गरज यावर भर देणाऱ्या या परिसंवादात धोरणात्मक लक्ष्यित क्षेत्रांवरही विचारमंथन झाले. याव्यतिरिक्त, बुकिंग निर्णयांमधील ऐतिहासिक कल, शैक्षणिक धोरण सुसुत्रीकरणाची अत्यावश्यकता आणि पर्यटन करिअरबद्दल तरुणांमधील बदलती धारणा याकडे लक्ष वेधले गेले.
या परिषदेच्या फलस्वरूप भारतातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि देशाच्या जागतिक पर्यटन स्थितीला मजबुती देण्यासाठी मंत्रालयाचा वैचारिक पाया लक्षणीयरीत्या विस्तारण्याची अपेक्षा आहे.
सुरक्षा आणि निर्धोकपणा, आरोग्यसेवा पर्यटन क्षमता, डिजिटलायझेशनचा प्रभाव, परकीय धारणेतील परिवर्तन, समन्वित धोरणात्मक प्रयत्न, माध्यमांचे प्रतिनिधित्व आणि प्रतिभा विकासासाठी पुढाकार, शाश्वतता आणि उद्योगाचे दर्जात्मक परिवर्तन यासारख्या महत्वपूर्ण समस्यांवर गोलमेज परिषदेत प्रामुख्याने चर्चा झाली.
गोलमेज परिषदेने ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी एक सशक्त व्यासपीठ म्हणून काम केले आणि भारताच्या पर्यटनाला शाश्वत आणि नाविन्यपूर्ण विकासाकडे नेण्यासाठी सहयोगी प्रयत्नांचा मार्गही मोकळा केला. या कार्यक्रमादरम्यान चर्चिला गेलेला एकत्रित दृष्टिकोन आणि धोरणे जागतिक पर्यटन नेतृत्व म्हणून भारताचे स्थान बळकट करण्यात लक्षणीय योगदान देतील असा अंदाज आहे.