निवडणुकीतील प्रत्येक खर्चाची नोंद आवश्यक – खर्च निरीक्षक एस. वेणू गोपाल

गडचिरोली :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूकिच्या पार्श्वभुमीवर उमेदवार व राजकीय पक्ष यांनी आयोगाने ठरवून दिलेल्या मर्यादेत व नियमानुसार खर्च करणे आवश्यक असून निवडणुकीदरम्यान केलेल्या प्रत्येक खर्चाची व्यवस्थीत व सुयोग्य नोंद ठेवण्याच्या सूचना निवडणुक खर्च निरीक्षक एस. वेणू गोपाल यांनी आज दिल्या.

एस.वेणू गोपाल यांनी आज निवडणूक निरीक्षक कार्यालयात उमेदवारांच्या निवडणुक खर्च लेख्यांचे निरीक्षण केले. यावेळी निवडणूक खर्चाचे नोडल अधिकारी तथा कॅफो हेमंत ठाकूर, चेतन हिवंज व खर्च निरीक्षण पथक तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रचार सभेत उमेदवार व पक्ष यांचा सुक्ष्म अभ्यास करुन खर्चाचे वर्गीकरण करणे, तालुका स्तरावर दुय्यम शॅडो रजिष्टर अद्यावत करणे, तसेच उमेदवारांच्या प्रत्येक सभा, बैठका, रॅलीचे चित्रीकरण निवडणूक आयोगाच्या नियमानुसार करणे आदी सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

निवडणूक लेख्याचे पुढील निरीक्षण 8 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकसभा निवडणूक : आज 4 नामांकन दाखल

Wed Apr 3 , 2024
यवतमाळ :- यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आज दिनांक 2 एप्रिल रोजी एकून 4 उमेदवारांनी एकूण 7 नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे दाखल केले.नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये संजय उत्तमराव देशमुख, पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकून 2 अर्ज, अनिल जयराम राठोड, पक्ष समनक जनता पार्टी एकून 3 अर्ज, संदीप संपत शिंदे, अपक्ष 1 अर्ज, मनोज महादेव गेडाम, अपक्ष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com