संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- पोरवाल कनिष्ठमहाविद्यालयात माहिती अधिकार दिना निमित्त कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डॉ सुधीर अग्रवाल होते.या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून पंचायत समिती कामठीचे नायब तहीलदार राजीव बमनोटे, प्रमूख अतिथी म्हणून नायब तहसिलदार अमर हांडा व महसूल सहाय्यक ज्योती गोरलेवार व पर्यवेक्षक प्रा. व्ही. बी. वंजारी सर उपस्थित होते.
प्रमुख वक्ता म्हणून बोलताना नायब तहसिलदार राजीव बमनोटे यांनी माहिती अधिकाराचे स्वरूप व माहिती अधिकार वापर कसा करावा याची संपूर्ण माहिती विद्यार्थ्याना दिली.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल यांनी माहिती अधिकार हे लोकशाहीत नागरिकांना मिळालेले प्रभावी अस्त्र असल्याचे व माहिती माहिती अधिकार हा व्यक्तीचा नैसर्गिक मानवी आणि मूलभूत अधिकार असल्याचे प्रतिपादन केले.आपल्या देशात २००५ पासून समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा कायदा देशपातळीवर कायदा लागू झाला. सरकारी अधिकाऱ्यांनी सामान्य लोकांना माहिती देणे हे त्यांचे कर्तव्य आहे, त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसून प्रशासनात पारदर्शकता येण्यास मदत झाल्याची त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक ललित मासुरकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका मल्लिका नागपुरे यांनी केले. कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.