अमरावती :-संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती, मूलजी जैठा कॉलेज (स्वायत्त), जळगाव, बी. पी. आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज, चाळीसगाव आणि व्ही. एस. नाईक कॉलेज, धारणी यांच्या संयुक्त विद्यमाने धारणी येथे मेळघाटातील आदिवासी शेतकरी बंधू आणि भगिनीसाठी “मोत्यांची शेती” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा १३ फेब्रुवारी २०२३ रोजी, धारणी येथे आयोजित करण्यात आली होती. सदरहू कार्यशाळेचे उद्घाटन प्रा. हेमलता नांदुरकर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी प्रा डॉ. विनोद नागले, यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यशाळेचे अध्यक्ष स्थान प्रा. एम. ए. पवार यांनी भूषविले, आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी “व्यवसायाभूमिमुख शिक्षण मेळघाट मधील शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आणि या कार्यशाळेच्या आयोजनाबाबत हर्ष व्यक्त केला”. आपल्या उद्घाटनपर भाषणात प्राध्यापक डॉ. हेमलता नांदुरकर, विभाग प्रमुख- प्राणीशास्त्र विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, यांनी अशा प्रकारच्या आणखी कार्यशाळा भविष्यात घेण्याचे आश्वासन दिले.“मोत्यांची शेती” साठी लागणारी माहिती डॉ. मनोजकुमार चोपडा आणि प्रा. हेमलता नांदुरकर यांनी व्याख्यानाद्वारे देण्यात आले. “मोत्यांची शेती” कशी करावी यासाठी आदिवासी शेतकरी बंधू आणि भगिनीना डॉ. मनोजकुमार चोपडा, डॉ. नम्रता महाजन आणि डॉ. भारती तळेले यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. तद् नन्तर या कार्यशाळेत आदिवासी शेतकरी बंधू आणि भगिनीना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करता यावे म्हणून त्यांना “मोत्यांची शेती” साठी लागणारे साहित्य भेट देण्यात आले. जेणेकरून ते स्वतः घरी “मोत्यांची शेती” करू शकतात आणि व्यवसाय वाढवू शकता. सदरहू कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अतुल नाईकवडे यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. बहादुरे यांनी केले. बी. पी. आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज, चाळीसगाव चे प्रा. अभिषेक धांदे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. प्रा. धांदे यांनी मेळघाटातील आदिवासी शेतकरी बंधू आणि भगिनीसाठी हि कार्यशाळा आयोजित करण्यासाठी, आणि धारणी महाविद्यालयाचे IQAC समन्वयक डॉ एन के देशमुख, डॉ बी डी जामनेकर, डॉ जी एस वैरागडे, प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा डॉ एम एस बेले तथा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या कार्यशाळेला मेळघाटातील अतिदुर्गम भागातील मालुर फॉरेस्ट, रोरा,घोटी, इ. गावातील, 13 महिला व 18 पुरुष असे मिळून 31 आदिवासी शेतकऱ्यांनी हजेरी लावली तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाचे 26 विद्यार्थी व शिक्षक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ विनोद काळे तथा प्रयोगशाळा सहाय्यक श्याम चहाकार यांनी, आणि स्थानिक बी एन कॉलेज धारणी च्या विद्यार्थ्यांनी देखील सहभाग नोंदविला.
मेळघाटातील आदिवासी शेतकरी बंधू आणि भगिनीसाठी “मोत्यांची शेती” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com