संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 9:- नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत मानल्या जाणाऱ्या येरखेडा ग्रा प वर कांग्रेस प्रणित पॅनल ची सत्ता स्थापित असून सरपंच पदी दलित महिला सरिता रंगारी विराजमान होत येरखेडा ग्रा प चे नेतृत्व सांभाळत आहे पण ही बाब विरोधक असलेल्या भाजप प्रणित पॅनल ला पचविण्यासारखे होत नसल्याने अवघ्या काही महिन्यातच विरोधकांनी दूषित राजकारण करून येरखेडा ग्रा प ला नगर पंचायत करण्याचा कट रचित सत्तेचा पुरेपूर फायदा घेत नगर पंचायत बनविण्यासाठी ग्रा प चा ठराव नसतानाही नगर पंचायत ची अधिसूचना जाहीर केली.हा प्रकार येरखेडा ग्रा प च्या दलित महिला सरपंच सरिता रंगारीवर होत असलेले अन्यायकारक ठरत आहे.त्यामुळे न्यायिक हक्कासाठी व संविधानाच्या बचाव म्हणून येरखेडा ग्रा प प्रशासन रस्त्यावर उतरली असून आज जयस्तंभ चौक स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात अन्याय करणाऱ्या भाजपा समर्थीत महाराष्ट्र महायुती सरकारचा विरोध करून सरपंच सरिता रंगारी यांच्या वतीने एक दिवसीय धरणा आंदोलन केले.
या धरणा आंदोलनाला माजी जी प अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर,अनुराधाताई भोयर,पंचायत समिती सभापती दिशाताई चनकापुरे,उपसभापती दिलीप वंजारी, खैरी ग्रा प चे सरपंच धांडे, प्रसन्ना तिडके,नाना कंभाले,माजी नगराध्यक्ष शकुर नागानी,रत्नदीप रंगारी,माजी सरपंच किशोर धांडे,वारेगाव ग्रा प सरपंच,पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी,सोनू कुथथे,राजेश बनसिंगे,माजी सरपंच ओमप्रकाशकुरील,माजी उपसरपंच शोभा करहाडे, ग्रा प सदस्य अनिल पाटील,अनिल भोयर,रोशनी भस्मे, गीताताई परतेकी,सुमेध दुपारे, रशीदा बेगम आसिफ अली,नाजीश परवीन,इम्रान नईम नसुर अहमद, दीपाली वानखेडे,अर्चना सोनेकर,अमोल घडले, रोशनी भस्मे ,प्रवीण भायदे, निर्मल वानखेडे,आदींनी उपस्थिती दर्शवून समर्थन दर्शविले.