संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कन्हान पोस्टे ला गुन्हा दाखल करून आरोपीस अटक.
कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत बोरी (सिंगारदिप) गावात ९ वर्षीय मुलीवर १७ वर्षीष मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पिडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.
प्राप्त माहिती नुसार रविवार (दि.२४) डिसेंबर ला सकाळी १० वाजता दरम्यान पीडित मुलीची आई घरी हजर असतांना लहान मुलाने सांगितले की, ” घरा समोर च्या बाजुला राहणाऱ्या मुलाने ताई सोबत अत्याचार केला. शनिवार (दि.२३) डिसेंबर ला दुपारी १२ ते १ वाजता दरम्यान पीडित मुलगी व तक्रारदार महिले च्या भासऱ्याचा मुलगा साईकलने गाई च्या झोपड्या कडे जात असतांना घरासमोर बाजुला राहणारा १७ वर्षीय मुलगा मुलीच्या पाठीमागे गेला. भासऱ्याचा मुलगा गाईच्या झोपड्यात गेला म्हणुन मुलगी पण त्याच्या पाठीमागे झोपड्यात गेली. हे पाहुण आरोपी मुलगा मुलीच्या पाठीमागे झोपड्यात गेला आणि कुत्र्याला खेळवत होता. मुलीने त्यास कशासाठी आला असे विचारले तर आरोपी मुलागा मग सांगतो म्हणाला व त्याने तक्रारदार महिलेच्या भासऱ्याच्या मुलाला कुत्र्याला घेवुन बाहेर पाठविले. आरोपी मुलाने मुलीला जवळ बोलावुन झोपड्यातल्या लाकडी पलंगावर झोपवुन लैंगिक अत्याचार केला. काही वेळाने महिलेच्या भासऱ्याचा मुलगा झोपडीत आल्याने मुलीने त्याला बघुन मुलास उठ म्हटले असता मुलगा उठतो म्हणाला आणि थोड्या वेळाने उठला. त्यानंतर मुलगी आपल्या घरी गेली.
पीडित मुलीच्या आई ने परत मुलीला विचारले असता मुलीने सांगितले कि शुक्रवार (दि.२२) डिसेंबर ला दुपारी १२ ते १ वाजता आरोपी मुलाने मुलीला समाज भवनच्या बाथरूम मध्ये घेऊन गेला व अंगावर झोपवुन लैंगिक अत्याचार केल्याने त्या दिवसी पीड़ित मुलीची तब्येत बरी नसल्याने ती शाळेत गेली नाही व दिवसभर घरी थांबली होती. मुलीच्या आई ने भासऱ्याचा मुलाला विचारणा केली असता मुलाने सांगितले कि, आरोपी मुलाने गाईच्या झोपड्यातुन मला बाहेर पाठविले आणि ताईशी अत्याचार करत होता. असे सांगितल्याने मुलीच्या आई ने रागाने आरोपी मुलाला हटकले असता त्याने सांगितले की मी काहीच केले नाही. फक्त झोपडीजवळ तुमची मुलगी आणि मुला सोबत बोरं खाल्ली आणि घरी आलो असे म्हणाला. महिलेचे पती मच्छी पकडायला कन्हान नदीवर गेले होते म्हणुन महिला पण कामावर चालली गेली व सायंकाळी कामावरून घरी आल्यावर रात्री ८ वाजता महिलेने पतीला घटनेची हकीकत सांगितल्याने सोमवार (दि.२५) डिसेंबर ला महिलेने मुली सोबत पोलीस स्टेशन गाठुन १७ वर्षीय मुला विरुद्ध तक्रार दिल्याने पोलीसांनी आरोपीस अटक करुन त्याचा विरुद्ध अप क्र. ७९६/२३ कलम ३७६ (एबी), ३७६(२)(एफ), ३७६(२)(आय), ३७६(एन) भादंवि सहकलम ४,६,८, १० बालकांचे लैंगिक अपराधा पासुन संरक्षण अधिनि यम २०१२ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे.