संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- भारताचे राष्ट्रगीत दर्शविते की आपल्या भारत देशात संस्कृती,परंपरा,धर्म आणि भाषा यात फरक असूनही भारत एका ध्वजाखाली एकत्र आहे.देशभक्ती ही एक भावना आहे जी अनेक आचरणातून दाखवली जाते.,ही आतून येणारी भावना आहे.राष्ट्रगीताचा आदर करणे हा देशाप्रती देशभक्ती पाहण्याचा एक मार्ग आहे.मातृभूमीच्या प्रेमासाठी जसे नागपूर शहरातील प्रत्येक चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्यात येतो त्याच धर्तीवर कामठी च्या चित्रपट गृहातही चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्यात यावे अशी मागणी कामठी चे तहसीलदार गणेश जगदाडे यांना दिलेल्या सामूहिक निवेदनातून करण्यात आली.
निवेदन देताना लोकसेवक दिपंकर गणवीर,ग्रा प सदस्य अनिल पाटील,अनुभव पाटील,नागसेन सुखदेवें,सुभाष सोमकुवर,आशिष मेश्राम,नरेश वासनिक,राजन मेश्राम,नरेश वाघमारे,सलमान अब्बास आदी उपस्थित होते.