संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामगार नगर रहिवासी एका विवाहित तरुणीने पतीच्या जाचक त्रासाला कंटाळून घरी कुणी नसल्याचे संधी साधून घरातील छताला दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडे दहा दरम्यान घडली असून मृतक विवाहित तरुणीचे नाव शहाणा फिरदोस नावेद अली वय 29 वर्षे रा कामगार नगर कामठी असे आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन तिच्या पार्थिवावर शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात शवविच्छेदन करण्यात आले.पोलिसांनी सदर घटनेची नोंद करीत आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.