संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– वनविभागाचे क्षेत्र सहायक व वनरक्षक पोहचुन घटनास्थळाचा पंचनामा केला.
कन्हान :- पारशिवनी तालुक्यातील मौजा बखारी गावातील गरीब शेतकरी संजय पांडे यांनी शेतातील कोठयात बांधलेल्या प्राळीव जनावरा पैकी बिबटयाने मध्यरात्री सहवाल जातीचे कारवळ व जर्शी गो-याची शिकार करून ठार केल्याने वन विभागाने परिसरात असलेल्या वाघ व बिबटयांचा बंदोबस्त करून पशु मालकाला त्यांची नुकसान भरपाई त्वरित देण्याची मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांनी केली आहे.
बखारी गावातील गरीब शेतकरी संजय भैय्याजी पांडे यांनी आपल्या सहवाल जातीचे कारवळ व जर्शी गोरा आणि जनावरे रविवार (दि.९) वाजता रात्री ७ वाजता आपल्या शेतात बाधुन घरी आले. सोमवार (दि.१०) ला सकाळी ९ वाजता दुध काढण्याकरिता शेतात गेलो असता बिबट्याने शेतातील कोठयात बाधलेले कारवळ व एका गो-याची शिकार करून जिवे मारल्याचे दिसुन आले. शेतकरी संजय पांडे यांनी घटनेची माहिती क्षेत्राचे वनरक्षक सतिश वासनिक यांना दिली. वनरक्षक वासनिक यांनी संबंधित घटनेची माहिती क्षेत्र सहाय्यक बि डी वरकड़े तसेच वरिष्ठ अधि काऱ्यांना दिली. तदंतर वनरक्षक वासनिक व क्षेत्र सहायक वरकड़े यांचे सह बखारी येथील पीढीत शेतकरी संजय पांडे यांचे शेतातील कोठयात घटनास्थळी पोहचुुन पंचनामा करून घटनेची माहिती वरिष्ठ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याना घटनेचा अहवाल पाठवुन दिली.
या क्षेत्रात मागिल अनेक दिवसांपासुन वाघ व बिबट ङटकत आहे. पारशिवनी वनपरिक्षेत्र हद्दीतील बखारी गावासह जवळपासच्या गावात व शेतात बिबट व वाघाची दहशत असल्याने शेतात कामाकरिता मजुर येत नसल्याने शेतक-यांचे बरेच नुकसान होत आहे. त्यात शेतक-याच्या पाळीव प्राण्याच्या शिकारीने शेत करी चांगला अडचणीत सापडत आहे. त्यामुळे भटकत असलेल्या वाघ व बिबटयास वन विभागाने पकडुन दुर घनदाट जंगलात नेऊन मुक्तसंचाराकरिता सोडुन बंदोबस्त करावा. तसेच वन्य प्राणी बिबटयाने शिकार करून ठार केलेल्या कारवळ व गो-याची नुकसान भरपाई अंदाजे ५० हजार रुपये त्वरित वन विभागाने द्यावी. अशी मागणी पशुमालक संजय पांडे व बखारी परिसरातील शेतक-यासह नागरिकांनी क्षेत्र सहायक बि डी वरकडे व वनरक्षक सतिश वासनिक यांचेशी चर्चा करून केली आहे.