संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल कामठी येथे मोठ्या संख्येने येणाऱ्या नागरिकांसाठी कामठी विधी सेवा समिती व कामठी वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात मोठ्या संख्येतील नागरिकानी या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचा मोफत लाभ घेतला.
या शिबिराचे उदघाटन कामठी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश एम आर कामत यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी प्रामुख्याने वरिष्ठ वकील ऍड डी सी चहांदे,महिला वकील ऍड पी पी मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते तसेच वकील संघातील सदस्य व वकील संघ समिती सदस्य उपस्थित होते .शिबिराच्या यशस्वीतेसाठी ऍड पी टी गजवे,ऍड माधुरी बेलेकर,ऍड रिना गणवीर, ऍड परीक्षित यादव,ऍड आनंद नरवाडे,ऍड निशा महतो ,ऍड निकिता भोकरे,ऍड बासीद, ऍड विनय बोरकर,ऍड पंकज यादव,ऍड रविना डोंगरे,ऍड अमित डोंगरे,ऍड जिजा वाहाने,ऍड भीमा गेडाम,ऍड मोहम्मद सईद,ऍड योगेश बागडे,ऍड पूजा आळे, ऍड मृणाल भेलावे, ऍड मनोज शर्मा, ऍड संस्कृती नागदेवें, ऍड अश्विनी रामटेके,ऍड नितेश वासनिक आदींनी मोफत कायदेविषयक मार्गदर्शन विधी सेवा पुरविली.