– रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी रात्री कचरा फेकणाऱ्या दुकानदार व नागरिकांवर दुप्पट दंड आकारून फौजदारी कारवाई करा: सामाजिक कार्यकर्ता लोकेश शिवरेकर
कोदामेंढी :- नागपूर येथील गुजर नगर (गंगाबाई घाट) स्थित भूतेश्वर मंदिराकडे घाट जवळील पुलियाकडून जाणाऱ्या रस्त्यावर परिसरातील दुकानदार व नागरिक रात्रीला कचरा फेकत असल्याने त्या रस्त्यावर घाणीची साम्राज्य निर्माण झालेले आहे. रस्त्यावर जाताना दुर्गंधी येत असून विविध आजाराच्या फैलाव बालकांपासून तर वृद्धांपर्यंत होण्याच्या धोका वाढलेला आहे. तसेच त्या रस्त्याने भूतेश्वर मंदिराकडे आवागमन करणारे भाविकही कमालीचे त्रस्त आहेत.
महानगरपालिकेतर्फे घरातील व दुकानातील कचरा ,कचरा गाडीत टाकण्यासाठी दररोज कचरा गाड्याची व्यवस्था केलेली आहे. तरीही काही उपद्रवी दुकानदार व नागरिकरस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकतात . अशा उपद्रव नागरिक व दुकानदाराच्या बंदोबस्त करण्यासाठी मनपातर्फे दंड आकारण्यात येत असून दंड आकारण्यासाठी विशेष उपद्रव पथक नेमण्यात आलेले आहे . त्यामुळे दिवसा कचरा फेकणाऱ्यांचे प्रमाण कमी झालेले आहे . मात्र काही उपद्रवी नागरिक व दुकानदार दिवसा उपद्रव पथक कारवाई करत असल्याने रात्रीला कुणाला न दिसता रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकून रस्ता व सार्वजनिक ठिकाण दुर्गंधीयुक्त करत आहे, असे येथील अनेक सामाजिक कार्यकर्ते व त्रस्त नागरिक नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगत आहेत.
त्यामुळे मनपाने रात्रीला कचरा फेकणाऱ्या नागरिक व दुकानदारावर दुप्पट दंड आकारून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची व त्यासाठी रात्रीला विशेष उपद्रवी पथकाची नेमणूक करण्याची मागणी गुजर नगर (गंगाबाई घाट) येथील सामाजिक कार्यकर्ते लोकेश शिवरेकर सह सर्व सामाजिक कार्यकर्ते व कचऱ्यापासून त्रस्त बालगोपाल, वृद्धांसह भूतेश्वर मंदिराकडे त्याच रस्त्याने आवागमन करणाऱ्या भाविकांनी केली आहे.