निराधारांना एक मानुसकीची मदत

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 11:- नागपुर ग्रामीण अंतर्गत ग्रा.पं.बेसा- बेलतरोडी येथे झालेल्या भीषण अग्नितांडवात असंख्य लोकाँचे संसार उध्वस्त झाले अश्या गरजू लोकांना मदत व्हावी या उदार भावनेतून माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी मदतीचा हात पुढे करीत माणुसकीचे दर्शन घडविले.
याप्रसंगी कामठी मौदा विधानसभा कांग्रेस च्या वतीने अग्नितांडवात निराधार झालेंल्या नागरिकांना माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर, जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले , बेसा बेलतरोडी ग्रा प सरपंच सुरेश बनाईत यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तु ,अन्नधान्य कीट तसेच ताड़पत्री चे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी ग्रा प चे सर्व सदस्य , कढोली ग्रा प चे माजी सरपंच अशोकजी घुले, उपसरपंच गणेश गावंडे ,विनोद गावंडे, सोपान गावंडे, योगेश झोड, मोरेश्वर ठाकरे ,आकाश शिंदेमेश्राम, आदींच्याही हस्ते वरील सर्व जिवनावश्यक वस्तुचे वाटप करून पीडितांना मदत करण्यात आली.सदर मदत कार्यात आवार्ड क्लब नागपुर यांनी मोलाचे सहकार्य केले तर या मदतीबद्दल मदतप्राप्त निराधारानी सुरेशभाऊ भोयर सह आदींनी मदतीच्या भावनेतून माणुसकीचे दर्शन घडविल्याचे सांगत आभार व्यक्त केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

'आईस गोला'च्या अतिरेकाने आरोग्याला धोका

Wed May 11 , 2022
संदीप कांबळे,कामठी -अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष कामठी ता प्र 11:-वाढत्या उन्हाच्या प्रकोपातून बचाव करण्यासाठी नागरिकांची शीतपेय तसेच इतर थंडपेय वस्तुसह ‘आईस गोला’ कडे आपला कल वाढविला आहे.यानुसार कामठी शहरात थंडपेय चे मोठमोठे कॅफे उघडले आहेत.उन्हाळ्यात नागरिकांची वाढती थंडपेय ची मागणी लक्षात घेता व्यावसायिकांनी नफा कमविण्याच्या दृष्टीने शीत वस्तूंचा ‘गोडवा’ वाढविण्यासाठी सर्रास सॅकरीन चा वापर करीत आहेत.त्यामुळे आईस गोला सारखे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com