वॉलपेंटिंग स्पर्धा म्हणजे संकल्पपूर्तीची आरंभ ज्योत : राधाकृष्णन बी. यांचे प्रतिपादन
– पुरस्कार वितरण सोहळ्याला उत्स्फुर्त प्रतिसाद
नागपूर :- आपल्या कल्पकतेतून शहरातील विविध इमारतींच्या कुंपण भिंतींना अधिक सुशोभित करून, निर्जीव भिंती बोलक्या करणाऱ्या शहरातील विविध व्यावसायिक आणि विद्यार्थी चित्रकारांनाचा नागपूर महानगरपालिकेच्या वतीने भव्य सन्मान करण्यात आला. डिसेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या भव्य वॉल पेंटिंग स्पर्धेच्या व्यावसायिक चित्रकार गटात प्रशांत कुहीटे आणि विद्यार्थी गटात दर्शन देवते आणि समूह यांनी साकारलेल्या कलाकृतींना प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही वॉलपेंटिंग स्पर्धा म्हणजे नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्याच्या संकल्पपूर्तीची आरंभ ज्योत असल्याचे प्रतिपादन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने डिसेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या भव्य वॉल पेंटिंग स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार (ता. १२) जानेवारी रोजी राजे रघुजी भोसले नगरभवन ( टाऊन हॉल), महाल येथे आयोजित करण्यात आला. याप्रसंगी मनपाचे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त गजेंद्र महल्ले, शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, चित्रकला स्पर्धेचे परीक्षक सेवानिवृत्त प्राध्यापक नंदकिशोर मानकर, प्रा. प्रभाकर पाटील, चित्रकार प्रकाश बेतावार, युसीएन वृत्तवाहिनीचे संपादक राजेश सिंग, नागपूर@२०२५ चे मल्हार देशपांडे यांच्यासह मनपाचे सहाय्यक आयुक्त, अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. म्हणाले की, शहराच्या स्वच्छतेसाठी नागपूर महानगरपालिका द्वारे आवश्यक ते सर्व कार्य केले जात आहेत. तरी नागपूर शहर स्वच्छ आणि सुंदर राखण्यासाठी लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे. लोकसहभागातून शहर स्वच्छतेसाठी मनपाद्वारे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. याच अंतर्गत लोकसहभागातून शहराचे सौंदर्यीकरण उत्तम होऊ शकते हे या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या निदर्शनास येत आहे. स्वच्छ भारत अंतर्गत इंदोर हे उत्तम शहर असले तरी हे एकरात्रीच प्रथम आले नाही, त्यासाठी स्थानिकांनी प्रशासनासोबत मिळून मेहनत केली आणि त्याचा परिणाम आपण बघतोय. आम्ही देखील येत्या २०२५ पर्यंत नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर स्वस्थ साकारणारे असा संकल्प केला आहे आणि ही वॉलपेंटिंग स्पर्धा नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्याच्या संकल्पपूर्तीची आरंभ ज्योत आहे. पुढील काळात नागपूर महानगरपालिका अशा विविध स्पर्धा घेणार आहे. तरी नागरिकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवित संकल्पपूर्तीसाठी हातभार लावावा आणि नागपूरला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ ठेवण्यासाठी मदत व्हावी, असे आवाहन राधाकृष्णन बी यांनी केले.
स्पर्धेत हजारो नागरिकांचा सहभाग : राम जोशी
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले. स्पर्धेची माहिती ते म्हणाले की, मनपाच्या भव्य वॉल पेंटिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शहरातील इमारतीच्या भिंतींवर नागूपरचा समृद्ध असा कलेचा वारसा झळकत आहे. ही स्पर्धा म्हणजे लोकसहभागाचे उत्तम उदाहरण आहे. स्पर्धेत जरी एकूण प्रत्येक्ष एक हजाराहून अधिक चित्रकारांनी सहभाग नोंदविला असला तरी अप्रत्यक्षपणे या स्पर्धेत चित्रकारासह त्याचे कुटुंब, प्राध्यापक, मित्र असे मिळून १० हजाराहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. असे सांगत जोशी पुढे म्हणाले की, जे काही व्यावसायिक चित्रकारांना नाही जमले असे कार्य काही विद्यार्थी चित्रकारांनी अवघ्या २४ तासांच्या करून दाखविले आहे. त्यांनी २४ तासांच्या आपली उत्कृष्ट कलाकृती साकारून दाखविली आहे. असेही जोशी म्हणाले.
अत्यंत कौतुकास्पद उपक्रम: अजय गुल्हाने
सर्वसामान्य नागरिकांना उपक्रमात सहभागी करून घेत चित्रकलेच्या माध्यमातून शहराच्या भिंतींवर आपला समृद्ध कलेचा वारसा दर्शविणे हे अत्यंत कौतुकास्पद असल्याचे नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने म्हणाले. तसेच नागपूर स्मार्ट सिटी महानगरपालिकेच्या विविध उपक्रमात नेहमीच सोबत असेल असा विश्वासही गुल्हाने यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी पोहरे आणि मधू पराड यांनी केले.
कार्यक्रम ठरला ‘शून्य कचरा’ कार्यक्रम
नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्याच्या उद्देशाने ‘शून्य कचरा’ ही संकल्पना या भव्य पुरस्कार वितरण कार्यक्रमात यशस्वीरित्या राबविण्यात आली. कार्यक्रमात कचरा होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात आली, हा संपूर्ण कार्यक्रम ‘शून्य कचरा’ कार्यक्रम ठरला. कार्यक्रमात प्लास्टिक ऐवजी मातीच्या कुंडीत तुलसीचे रोपटे देवून अतिथिंचा सत्कार करण्यात आला. तसेच चहा सुध्दा मातीच्या पेल्यात आणि काचेच्या ग्लासमध्ये देण्यात आला. नागरिकांनी देखील आप-आपल्यापरीने शून्य कचरा संकल्पना राबवावी असे आवाहन आयुक्तांनी केले. यासाठी उपस्थितांनी मनपाचे कौतुक केले.
पुरस्कार प्राप्त व्यावसायिक चित्रकार
प्रथम – प्रशांत श्याम कुहिटे आणि टीम
व्दितीय – सदानंद दादाराव चौधरी आणि टीम
तृतीय – कृष्णकुमार दाभेकर, अतुल ठाकरे
प्रोत्साहनपर – दिनेश निळकंठराव गुडधे, आशिष शि. भेलांडे, शैलेश एस. बोदेले, अजय दा. कान्हेरे, वैशाली फटींग, अपर्णा राजवैद्य, सिधांत अशोक डोंगरे, किशोर काशिनाथ सोनटक्के, आशिष से. पलेरिया, गौरव संतोष सुरदास
पुरस्कार प्राप्त विद्यार्थी गट
प्रथम – दर्शन देवते, केशव भगत, गौरव नगराळे,मयुर सिरसाठ
द्वितीय – प्रज्वल बुले, पूर्वा शिरके, नेहा मालोदे, आशिष कुरील, नेहा पाटील
तृतीय – मिनेश व्ही. प्रजापती, श्रृति पी. भावसार, संस्कृती इंगळे, आकाश चव्हाण, द्युषंत रेलकर
प्रोत्साहनपर – खुशाली बांते, जनुश्री शाहू, वाणी चौरे, निश्चला खांडेकर, भानुप्रतापे साहू, साहिल बालपांडे
प्रोत्साहनपर – अनुराग आर. मानकर, चंद्रकांत तायडे, यश एन. भोगले, बॉबी एस. बारई, वैष्णवी दांडेकर, साक्षी एस. घायसुंदर
प्रोत्साहनपर – पुजा बोडखे, सेजल शाहू, रुचि मेश्राम, प्रज्ञा मेश्राम
प्रोत्साहनपर – भुपेंद्र कवडते, रोहीनी दुपारे, आकांक्षा हेडाऊ, पूर्वा मेंडजोगे, शशी गुप्ता
प्रोत्साहनपर – पुनम सुभाष वट्टी, बालचंद देवचंद राऊत, आनंद पंढरीची शेंडे, तेजस सुरेशराव पांडे
प्रोत्साहनपर – सानिया सिंग, विजया बाबरे, रुतुजा धांडे, सिद्धी फुंडे, वैशाली पुसम, विशाखा झोडापे
प्रोत्साहनपर – दिक्षा डी. वरखडे, निशा निमगडे, अक्षदा नक्षिने, सयाली दाणी, श्रृतिका बुटे
प्रोत्साहनपर – निखिल आतराम, वल्लभ कौंडीन्य, अमोल बोधने, देवा वैद्य
प्रोत्साहनपर – खुशी अग्रवाल, संस्कृती वरघडे, प्रतिक खापरे
प्रोत्साहनपर – सिद्धि हिंगे, अभिषेक कुमार, सौम्या घुशी, चेतना, नयना, दिव्या देशमुख