– कोंढाळी मध्ये व्यापार पेठ, शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा संस्थाचा बंद
– कोंढाळी येथील समता मैत्री दल व संविधान बचाव समितीचेवतीने शिस्तपद्धतीने निषेध/आक्रोश मोर्चा काढण्यात आला
– राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री , यांना दिले मागणीचे निवेदन
-कोंढाळी चे ना.तहसीलदार भागवत पाटील यांना निवेदन देण्यात आले
कोंढाळी :- येथील एसी, एस टी, ओ बी सी, एन टी, व्ही जे, सर्व अल्पसंख्याक , समता मैत्री दल कोंढाळीतसेच संविधान बचव समिती, कोंढाळी यांचे संयुक्त विद्यमाने राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री यांनी राज्य सभेत चर्चे दरम्यान भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत डॉ बाबासाहेब यांचे नावांचा फॅशन म्हणून उपयोग केले जाते. हे वाक्य चे डाक्टर बाबासाहेबां अपमानास्पद वाक्य वापरले गेले. हा अपमान हा संपुर्ण देशाचा अपमान आहे .डॉ बाबासाहेब आंबेडकर हे फॅशन नाही तर देशाची आन बान शान आहे. ते आपल्या देशाचे ऊर्जा केंद्र आहेत,आणि सदैव राहणार. भाजपला संविधान बदविण्याकरीता लोकसभेत 400 खासदार दिले नाहीत म्हणून संविधान बदलु शकले नाही. हा राग असल्यामुळे व ई व्ही एम च्या विरोधात देशात वातावरण निर्माण झाले होते म्हणून त्यांनी एक देश एक इलेक्शन हा विषय आणला त्याला देशातील जनतेने नाकारले आहे या विषयावरून लक्ष वळविन्याकरिता असे अमीत शाहा यांनी केले याविरोधात संपूर्ण देशात आंदोलनं आंबेडकरी जनतेच्या वतीने केले जात आहे तेव्हा अमीत शाहानी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा व त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी
तसेच परभणी प्रकरणात एड- सोमनाथ सुर्यवंशी यांची पोलिसांनी केलेली हत्या व मागासवर्गीय वस्तीवर केलेला हल्ला यात शेकडो मागासवर्गीय लोक जखमी झाले हा अन्याय पोलिसांनी केला.असेल्या प्रकारचा संविधानाचा केलेला अपमान हा देश कधीही सहन करणार नाही. तसेच शहीद एड सोमनाथ सूर्यवंशी याच्या मारेकऱ्यांना शिक्षा द्यावी व सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबाला एक कोटी रु ची मदत करावी त्यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी.त्याच प्रमाणे बीड जिल्ह्यातील मस्सेजोग चे सरपंच स्व संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येचे मुख्य मारेकरी यांना अटक व स्व संतोष देशमुख यांच्या मारेकरीकर्यांना ही फाशी देण्यात यावी इत्यादी मागण्या या आक्रोश /निषेध मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आली.आक्रोश मोर्चा कोंढाळी येथील समता मैत्री बौद्ध विहार शनिवार पेठ कोंढाळी येथून ठवळे पुरा,श्री विठ्ठल मंदिर, श्री राम मंदिर, सराफा ओली, मेडिकल चौक, बाजार चौक, एफ सी चौक, उमाठे नगर, देशमुख लेऊट,रामनगर, दाणा गंज, चांदणी चौक, बसस्थानक,श्री अम्मा चा दरगाह ,ते कोंढाळी -वर्धा टी पॉईंट या मुख्य मार्गाने फिरुन येथील कोंढाळी येथील नायब तहसीलदार कार्यालया (हुतात्मा स्मारक) समोर शेकडो मोर्चेकऱ्यांचे रूपांतर सभेत झाले. या सभेत संविधान बचाव समितीचे पदाधिकारी दिगांबर डोंगरे, डॉ संजय ठवळे, अरूण भोंगळे, रामदास मरकाम, सतीश पाटील चव्हाण, अरूण उईके सुनील मेश्राम, रणजीत गायकवाड,एड -सुमेध गोंडाणे, एकनाथ पाटील, यांनी मार्गदर्शन केले.
या नंतर मागण्यांचे निवेदन नायब तहसील भागवत पाटील यांचे मार्फत देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल,व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी बहुजन क्रांति सेना, प्रहार संघटणा, वंचित बहुजन संघटणा, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), कांग्रेस, अल्पसंख्याक संघटना, अनेक संघटनांनी या आक्रोश/निषेध मोर्चात सहभागी झाले. कोंढाळी. येथील संपूर्ण व्यापार पेठ, सामाजिक, सांस्कृतिक, संस्थांनी बंद ला पाठिंबा दिला.
काटोल उपविभागीय पोलिस अधिकारी बापू साहेब-रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढाळी चे ठाणेदार राजकुमार त्रिपाठी यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी -सुनिल मेश्राम,दिपक मेश्राम,बाबा बागडे, स्वप्निल व्यास, संजय राऊत,मोहन ठवळे,यादव बागडते,दिनेश गिरडकर, प्रविण भागवत,अफसर हुसेन , विजय दहाट,अंकित रंगारी, मोहसिन शेख,अन्नू पठाण, विनोद माकोडे, सुरेंद्र कुर्वे, बबलू गोलाईत, तसेच काटोल येथील बहुजन क्रांति सेनेचे पदाधिकारी, तसेच एस सी, ओ बी सी ,एस टी,एन टी,व्हिजे,व अन्य संघटनांचे पदाधिकारी व महिला पुरूष , आबालवृद्धांनीपरिश्रम घेतले. बाळासाहेब जाधव यांनी आक्रोश निषेध मोर्चात सहभागी झालेल्या सर्व महिला/ पुरूष, व्यापारी प्रतिष्ठान, पोलीस व राजस्व प्रशासनाचे आभार मानले.