संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 14:- संपूर्ण जगाला शांती व अहिंसेचा मार्ग देणारे महाकारूनिक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा 16 मे ला सायंकाळी सहा वाजता येरखेडा येथिल बुद्ध धम्म संदेश समिती च्या वतीने धम्महाविरानुवत्र बुद्ध विहार येथून भव्य कँडल मार्च काढण्यात येईल.या भव्य कँडल मार्चच्या पूर्वी सायंकाळी 4 वाजता परित्राण पाठ करण्यात येईल त्यानंतर या कँडल मार्च चा शुभारंभ विशेष बुद्ध वंदना व घेऊन करण्यात येईल. तदनंतर हे कँडल मार्च प्रमुख मार्गाने भ्रमण करीत धम्महावीरानुवत्र बुद्ध विहारात कँडल मार्च चे समापन करण्यात येईल.
या कार्यक्रमाचे उद्घाटन दिल्ली चे भन्तेजी वेन रुपानंद थेरो,नागपूर चे भन्ते प्रज्ञा भद्र यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना नितीन राऊत व माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत कामठी पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कामठी शहर अध्यक्ष मो शोएब असद,माजी नगरसेवक नीरज लोणारे, धीरज मेश्राम, कृष्णकुमार भगत,माजी सभापती वसंतराव काळे, संजीव मेश्राम,अतुल राऊत,अमीत भोयर,प्रभाकर शिरसाट आदी उपस्थित राहतील.या कँडल मार्च मधून तथागत गौतम बुद्धांनी दिलेल्या शांती , करुणा व अहिंसेचा संदेश देण्यात येईल हे इथं विशेष..
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक बुद्ध धम्म संदेश समिती चे अध्यक्ष अनिल पाटील, उपाध्यक्ष गौतम तपासे,सुमेध दुपारे, सचिव गौतम पाटील,सहसचिव कल्पना तांबे, भरत सहारे, कमलेश बागडे तसेच सदस्य नवनीत सहारे,योगेश भगत,आशिष बावंनगडे,शुभम बावंनगडे, राहुल पाटील, आशिष मेंढे,धिरत तांबे,शुभम कानफाडे , विलेश वाघमारे,अश्विन पाटील, क्षितिज लांजेवार,सुशील लांजेवार तसेच बुद्ध धम्म संदेश समिती महिला मंडळ च्या समस्त सदस्यांचा विशेष सहभाग राहणार आहे.