संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ख्यातिप्राप्त कढोली गावातील मुलीने घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही या कमकुवत परिस्थितीला मात देत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून स्पर्धा परीक्षेचा सर गड केला व 15 सप्टेंबर ला आलेल्या एमपीएससी निकालातून प्रिंयंका राजेश झोड ने सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त पदी निवड होण्याचे यशप्राप्त केले.राज्यात ओबीसी प्रवर्गातून मुलींमध्ये प्रथम येऊन सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला.
यामुळे कढोली गावाचे नाव उंचावल्याबद्दल गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून या उत्साहाचा जल्लोष करीत माजी जी प सदस्य अनिल निधान यांच्या हस्ते प्रियंका झोड चा सत्कार करण्यात आला.व गावात जल्लोषाची मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.याप्रसंगी कढोली ग्रा प सरपंच लक्ष्मण करारे,उपसरपंच महेश कुपाले,ग्रा प सदस्य गोविंदा ठाकरे, बबन वानखेडे,राकेश गावंडे,आरती घुले,मनीषा ठाकरे,इंदिरा रंगारी,संगीता चौधरी,छाया ढोके तसेच अशोक घुले, रवी रंगारी,शंकर घुले,अरुण शहाणे,लक्ष्मण ठाकरे,रंगराव ठाकरे, राजू झोड, सतीश चौधरी,नानु ठाकरे,गजानन देशभ्रतार,योगेश डाफ,विक्की काशीमकर,बंडुजी ठाकरे,चंदू गाडबैल,भवेश शेंडे,अक्षय शिंदेंमेश्राम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
नुकत्याच 15 सप्टेंबर ला जाहीर झालेल्या एमपीएससी च्या निकालात कामठी तालुक्यातील कढोली गाव रहिवासी प्रियंका राजेश झोड यांचा राज्यात ओबीसी प्रवर्ग मुलीतुन प्रथम येत सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त पदी निवड झाली .या यशाने यशप्राप्त प्रियंका झोड तसेच यांच्या कुटुंबाचे नाव तर उंचावले मात्र कढोली गावाचे नाव सुद्धा उंचावले असून ही बाब कढोली वासीयांसाठी गौरवास्पद आहे.या यशाचा जल्लोष म्हणून माजी जी प सदस्य अनिल निधान यांच्या हस्ते प्रियंका झोड चा शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व आनंदोत्सव जल्लोष मिरवणूक काढण्यात आली.
प्रियंका झोड ह्या कढोली गावातील रहिवासी असून प्रियंका च्या कुटुंबात वडील राजेश झोड, आई मंगला,बहीण भाग्यश्री, अंकिता ,भाऊ योगेश आणि आजी सोंनबाई असे सात जण कुटूंबात असून वडील एकमेव कर्ता पुरुष असल्याने दोन एकर शेतीत मोलमजुरी करीत,दूध व्यवसायातून कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होते परिस्थिती हलाखीची होती.मात्र प्रियंका ने शिक्षणाची ओढ कायम ठेवत बारावीचे शिक्षण पूर्ण केल्या नंतर मत्स्य व्यवसायत पदवीचे चार वर्षे शिक्षण घेतल्या नंतर पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला त्यात पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले व राज्यात ओबीसी प्रवर्ग मुलीतुन प्रथम क्रमांक पटकावून सहाययक मत्स्यव्यवसाय आयुक्त पदाची शासकीय नोकरी मिळवली.या यशाबद्दल प्रियंका च्या कुटुंबासह कढोली गावाचे नाव उंचावले .तर या यशाचे श्रेय आई,वडील,आजी,आजोबा व मामाला जात असून त्यांच्या कष्टाचे चीज केल्याचा सार्थ अभिमान असल्याचे मत प्रियंका ने व्यक्त केले.