अरोली :- येथून जवळच असणाऱ्या कोदामेंढी येथील वार्ड क्रमांक दोन , अरोली बायपास रोडवर स्थित ,अद्वय बहुउद्देशीय संस्था ,नागपूर द्वारा संचालित दयाराम पब्लिक स्कूलमध्ये उद्या 10 फेब्रुवारी सोमवारला धरोवर समारंभ 2024 -25 म्हणजेच स्नेहसंमेलन चे आयोजन शाळेच्या आवारात सायंकाळी चार वाजता पासून करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख, कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे संस्थेचे संचालक सतीश भोयर, माजी पंचायत समिती सदस्य अनिल बुराडे, सरपंच आशिष बावनकुळे, उपसरपंच गोपाल गिरमेकर संस्थेचे सदस्य मीनल सतीश भोयर ,माजी सरपंच भगवान बावनकुळे, उमाकांत देवतळे, सामाजिक कार्यकर्ते रामबाबू देवणीनी सह गावातील, परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, पुढारी ,मान्यवर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आव्हान शाळेच्या प्राचार्यां किरण किटे यांनी केले आहे.