सौ. कांचनताई गडकरी यांना संमेलनाचे निमंत्रण देतांना ॲड.सौ.पल्लवी मुलमुले,नगर संयोजिका सौ.माया मंगळे, सौ.रिता भोयर, सौ. प्रियंका पिसे.
सावनेर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या, रामटेक विभागाचे, आपल्या कर्तृत्वाने समाजाच्या विविध क्षेत्रात सक्षम नेतृत्व करणाऱ्या “कर्तृत्ववान महिलांचे विभागीय संमेलन” ३ डिसेंबर २०२३, रविवार रोजी गणपती देवस्थान, आदासा येथे आयोजीत केलेले आहे. कार्यक्रमाला यशस्वी, करण्यासाठी विजया सावरकर, विभाग संयोजीका आणि सौ. कांचन आष्टणकर विभाग सहसंयोजीत हयांचे झंझावती दौरे सर्व तहसील व ग्रामीण क्षेत्रात सुरु आहेत.
कार्यक्रमाला पालक व मार्गदर्शक म्हणून सन्माननीय सौ. कांचनताई गडकरी, सौ. मनीषा संत आणि सौ अमिता पत्की लाभलेल्या आहे. प्रमुख अतीथी म्हणून डॉ. सौ. प्राची भगत, प्राध्यापिका सिमला सिंग, अँड. सौ. माधुरी चौधरी लाभलेल्या आहेत.
भारताच्या विकासात महिलांचा सहभाग व कर्तृत्ववान महिला मधील संवाद वाढविण्याबाबत विचार आणि चर्चा करणे हा संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. उद्देश साध्य करण्यासाठी आयोजीत महिला संमेलनात आपली सर्व शेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला डॉक्टर, वकील, इंजिनीयर,समाजसेविका, त्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
जास्तीत जास्त महिलांनी समेलनात उपस्थित राहावे असे आवाहन सौ. अरुणा मानकर, सौ. मनीषा पिंपळशेंडे,अँड सौ पल्लवी मुलमुले यांनी केले आहे.