पाच वर्षीय लेकरासमोर बापाने केली रेल्वेगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 27 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बुद्धनगर रहिवासी 35 वर्षीय विवाहित तरुणाने एकीकडे पत्नीची बिघडलेली मानसिक अवस्था त्यातच दोन लेकराचा सांभाळ, मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे अशा बिकट परीस्थितीतही कर्जवसुलीचा असलेल्या तगादाने असलेल्या आर्थिक संकटाच्या नैराश्येतून कन्हान रेल्वे फाटक ओलांडत असता सोबत असलेल्या पाच वर्षीय मुलाला समोर ढकालून भरधाव वेगाने येत असलेल्या रेल्वेगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रात्री साडे आठ दरम्यान घडली असून मूलासमोर आत्महत्या केलेल्या बापाचे नाव रोशन पंजाबराव वाहने वय 35 वर्षे राहणार बुद्धनगर कामठी तर मूळचा रहिवासी हा पंचशील नगर , सत्रापुर कन्हान असे आहे.
प्राप्त माहितीनुसार सदर मृतकाचे काही वर्षांपूर्वी बुद्धनगर कामठी येथील आरती नामक तरुणीशी विवाहबद्ध झाल्यानंतर सदर मृतकाने सासरीच आपले बस्तान मांडले होते.या वैवाहिक जीवनातून यांना आकाश व तान्व्ही असे एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.वाढती महागाई , कुटुंबाचा आर्थिक भार यातून निराकरण करण्यासाठी खाजगी बँकेद्वारे कर्ज काढले त्यातच कर्जाचा परतावा शक्य होत नसल्याने बँक प्रतिनिधींचा कर्ज वसुलीसाठी तगादा लावत होते त्यातच आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने जगावे तरी कसे?या मानसिक तणावातून मृतकाची पत्नी आरतीची मानसिक स्थिती ढासळली ज्यामुळे ही घरी न राहता सैरावैरा फिरत होती अशा परिस्थितीत या दोन्ही लेकरांचा सांभाळ मृतक रोशन करीत होता मात्र कर्ज वसुलीच्या प्रतिनिधी पासून याला सुद्धा अस्वस्थ वाटणे सुरू झाले होते .त्यातच दिवाळी पर्वा निमित्त घरोघरी फटाक्यांची आतिषबाजी सह दिवाळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरी होत होती तर या वाहने कुटुंबातील दोन्ही मुले मोठ्या आशेने उदासीन अवस्थेत आईच्या प्रतीक्षेत होते.त्यातच वडिलाने आपला पाच वर्षीय मुलगा आकाश ला आपल्या मूळ घरी असलेल्या सत्रापूर कन्हान येथील घरी नेऊन कुटुंबीय मंडळींशी भेट घालून कामठी कडे परत येत असता रस्त्यात कन्हान रेल्वे फाटक पडली असूनही मुलाला सोबत घेऊन फाटक ओलांडत होता दरम्यान नागपूर कडे भरधाव वेगाने येत असलेल्या मालगाडीला बघून आपल्या मुलाला पूढे ढकालून स्वता रेल्वे गाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती कळताच कामठी रेल्वे पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात मृतकाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करण्यात आले.तसेच कन्हान मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार सुद्धा करण्यात आले.मृतकाच्या पश्चात पत्नी,एक मूलगा,एक मुलगी तसेच दोन भाऊ व आई वडील असा आप्तपरिवार आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून एकीकडे आईची बीघडलेली मानसिक अवस्था व दुसरीकडे बापाने केलेली आत्महत्या ?अशा परिस्थितीत लहान लेकरांचे हाल बेहाल होत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

एक आठवडा लोटूनही बेपत्ता महिलेचा थांगपत्ता लागेना

Wed Oct 26 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 27 :- नागपूर महानगरपालिकेत नोकरीवर असलेल्या पतीचा अचानक मृत्यू झाल्याचा धसका घेतल्याने मानसिक वृत्ती बीघडलेली महिला 19 ऑक्टोबर ला भल्या पहाटे जरीपटका नागपूर येथील राहत्या घरून बीघडलेल्या मानसिक अवस्थेत निघून गेली असता सकाळी सात दरम्यान कामठी येथील नेताजी चौकात दिसली त्यानंतर कुठे निघून गेली याबाबत अजूनही शोध लागलेला नाही .यासंदर्भात जुनी कामठी पोलीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com