संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
नागपूर :- मैत्र सख्यांचे सामाजिक संस्था, हिवरी नगर, नागपुर यांच्या सौजन्याने आणि प्रा.अवंतिका लेकुरवाळे यांच्या द्वारा आयोजित जेष्ठ महिलांसाठी काल दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी एक दिवसीय सहल चे आयोजन करण्यात आले होते. यात महादुला नगर रहिवासी जेष्ठ महिलांना फेटरी चिचोली ‘शांतिवन’, बुद्धवन व अदासा धापेवाड़ा अश्या तीन ठिकाणी भेट देवून दुपारी भोजनाचा आनंद घेत संध्याकाळी या सगळ्या महिला महादुल्याला परतल्या.११५ महिलांचा या सहलीत सहभाग होता. या जेष्ठ महिलांची काळजी व देखरेखीसाठी सामाजिक कार्यकर्त्या दर्शना मानवटकर, माजी नगरसेविका अर्चना मंडपे तसेच श्री गजानन महाराज शिक्षण संस्थेच्या प्रीती सोबत गेल्यात.
जेष्ठ काँग्रेस सेवादल नेते घाडगे, ज्ञानेश्वर वाघ, सोपान मेश्राम , काळे , अजय बागड़े, काँग्रेस कामगार सेल अध्यक्ष आकाश ऊके, भूषण ढेंगरे, सुमेध पखिड्डे व सामाजिक कार्यकर्ते निखिल चौधरी या मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी या बसेसना निरोप देण्यात आला.