संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी विधानसभा मतदार संघात भरारी पथक प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले मंडळ अधिकारी राजेश सदाशिव चुटे यांनी कर्तव्यात कसूर करून कुठलीही पूर्वसूचना न देता गैरहजर राहून मोबाईलद्वारे झालेल्या संभाषणात आचारसंहिता कक्ष कर्मचारी यांच्याशी अपमानास्पद वक्तव्य करून त्याला व एसडीओ ला पाहून घेण्याची धमकी दिल्याने मंडळ अधिकारी राजेश चुटे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येत्या 20 नोव्हेंबर ला होऊ घातलेल्या कामठी विधानसभा निवडणुकीच्या पाश्वरभूमीवर 16 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे .तसेच या मतदार संघात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन न होता पारदर्शक व भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पडावी यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गोसावी यांनी विविध पथके निर्माण केले तसेच आदर्श आचारसंहिता कक्ष निर्माण केले तर नेमलेले भरारी पथक क्र 6 चे पथक प्रमुख मंडळ अधिकारी राजेश चुटे यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता 9 नोव्हेंबर च्या रात्री 12 ते 12 नोव्हेंबर 2024 च्या सकाळी 8 पर्यंत गैरहजर राहिले याबाबत आदर्श आचारसंहीता कक्ष कर्मचारी प्रदीप भोकरे यांनी राजेश चुटे यांना मोबाईल ने संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे देत यांच्याशी अपमानास्पद वागणूक केली.तसेच थांबा तुम्हालाही पाहतो आणि एसडीओ ला पाहतो अशी धमकी दिली यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी यांनी राजेश चुटेला कारणे दाखवा नोटीस बजावली यावरही कुठलेही प्रतिउत्तर न दिल्याने निवडणुकीच्या कामात अडथळा निर्माण करीत आदेशीत कर्तव्याचा भंग केल्याने निवडणुकीच्या कामात अडथळा निर्माण करून फोनद्वारे आचारसंहिता कक्ष कर्मचारी व निवडणूक निर्णय अधिकारी एसडीओ सचिन गोसावी ला धमकी दिल्याने फिर्यादी प्रदीप भोकरे यांनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून भरारी पथक प्रमुख मंडळ अधिकारी राजेश चुटे विरुद्ध लोकप्रतिनिधींत्व अधिनियम 1950,1951,1989 अनव्ये कलम 134 व 351(2)अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.