अरोली :- पो. स्टे. अरोली येथील स्टाफ पोस्टे हदीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारांकडुन खबर मिळाली कि, ट्रॅक्टर (मुंडा) क्र. एम. एच. ४०/सी. ए. ५१५६ व विना क्रमांकाची ट्रॉली वाहनाने अवैध्यरित्या रेती घेवुन खात कडे येत आहे. अश्या मिळालेल्या खबरेवरून अवैध रेती वाहतुक करणान्यांवर कार्यवाही करणे कामी फिर्यादी पोलीस स्टाफसह रवाना झाले. फिर्यादीला त्याच्या दिशेने समोरून एक ट्रॅक्टर ट्रॉली येतांना दिसली. सदर ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चालकास थांवण्याचा इशारा केला असता, त्याने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर ट्रॉली रोडच्या बाजुला लावली व ती ट्रैक्टर ट्रॉली तिथेच सोडून अंधाराचा फायदा घेवून तो पळून गेला. त्याचा पाठलाग केला असता तो मिळून आला नाही. पटनास्थळी ट्रॅक्टर ट्रॉलीची पाहणी केली असता एक निळ्या रंगाचा पाँवर ट्रक कंपनीचा ट्रॅक्टर (मुंडा) क्र. एम. एच. ४०/सी.ए.- ५१५६ व विना क्रमांकाची निळया रंगाची ट्रॉली दिसून आली. त्या ट्रॉलीमध्ये अंदाजे १ ब्रास रेती भरलेली दिसून आली, नमुद ट्रॅक्टर (मुंडा) क्र. एम.एच. ४०/सौ.ए.- ५१५६ किंमती अंदाजे ३,००,०००/- रू., विना क्रमांकायो ट्रॉली किंमती अंदाजे १,५०,०००/-रू, व त्यामध्ये भरून असलेली एक ब्रास रेती अंदाजे ३,०००/-रू. असा एकूण ४,५३,०००/-रू. चा मुद्देमाल घटनास्थळावरून ताब्यात घेवून जप्त करण्यात आला. आरोपी चालक व मालक नामे हिरामन ऐकल गिरीपुंजे, वय ३९ रा. खात यांचेविरूध्द पोस्टे अरोली येथे कलम ३७९, १०९ भादंवि, सहकलम ४८ (७), ४८ (८), महा. जमिन महसुल अधि. १९६६, सहकलम ४, २१ खाण आणि खनिज अधि. १९५७, सह कलम ३ सार्व, संपत्ती नुकसान प्रति. अधि. १९८४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक हर्ष पोहार (भा.पो.से), अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात अरोली येथील ठाणेदार निशांत फुलेकर पोहवा मनोज जयस्वाल यांनी केली.