नागपूर :-पोलीस ठाणे कपीलनगर हद्दीत, मौजा नारी, खसरा क. १४२/०१, १४२/०२, नगर भुमापन क. ३१२ मधील शासनाचे नावावर असलेल्या जमीनीचे बनावट कागदपत्रे तयार करून, ते खरे असल्याचे भासवुन, आरोपी क. १) दिपक त्र्यबक देशमुख २) किशोर त्र्यंबक देशमुख दोन्ही राहणार वठोणा, ता. आर्वी, जि. वर्धा ३) मुग्धा नंदकिशोर पाठक, रा. अंजनी माता नगर, मानस मंदीर चौक, वर्धा ४) जयश्री किसनराव कस्तुरे, रा. साची अपार्टमेंट, नरेंद्र नगर, सोनेगाव, नागपुर ५) ज्योती चंदन जामगडे, रा. २७, जेठपुरा, कदम हॉस्पीटल जयळ, चंद्रपुर यांनी संगणमत करून कट रचुन नमुद जमीन ही विकम चरणसिंग गुजर, यांना विकी करून शासनाची एकुण २४,३५.१३.२००/-रु. ची आर्थिक हेराफेरी करून फसवणुक केली.
याप्रकरणी नागपुर सुधार प्रन्यास येथील विभागीय देखरेख व अतिक्रमण चे काम पाहणारे फिर्यादी कमलेश बाबुलाल टेंभुर्णे, वय ३५ वर्षे, रा. कपीननगर, नागपुर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे. कपीलनगर येथे पोउपनि, पाटील यांनी आरोपीविरूध्द कलम ४२०, ४१८, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७१. १२०(ब), ३४ भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करून, आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास सुरू आहे.