नागपूर :-दिनांक २६.०६.२०२४ चे १३.०० वा. ते १४.०० वा. चे सुमारास, फिर्यादीचे बहीण जावाई नामे बळीराम तुकाराम मस्के, वय ५० वर्षे, रा. प्लॉ. नं. ४१. कामना नगर, पेट्रोलपंप मागे, कळमना, नागपुर हे त्यांचे मुलासह पोलीस ठाणे कळमना हद्दीत शिवशक्ती बार जवळ, शांतीनगर कडे जाणाऱ्या रोडवर मर्दाना हॉस्पीटल समोर कळमना येथे आधार कार्ड अपडेट करण्यास गेले होते. मुलगा सेंटरचे आंत गेला होता व ते बाहेर उभे असतांना, पांढऱ्या रंगाची कार क. एम.एच. ४० बि. डब्ल्यु ४०६९ चा चालक नामे राहुल तेजराम करारे, वय ३३ वर्षे, रा. जुना कामठी रोड, कळमना वस्ती, नागपुर याने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगात निष्काळजीपणे चालवून फिर्यादीचे बहीण जावईला घड़क देवुन गंभीर जखमी केले. जखमी यांना उपचाराकामी मेयो हॉस्पीटल येथे नेले असता, डॉक्टरांनी त्यांना तपासुन मृत घोषीत केले.
याप्रकरणी फिर्यादी बबन लक्ष्मणराव ठाकरे, वय ६५ वर्षे, रा. कामना नगर, कळमना, नागपुर यांनी दिलेल्या सुचनेवरून पोलीस ठाणे कळमना येथे सपोनि गव्हाणे यांनी कलम २७९, ३३८, ३०४(अ) भा.दं. वि. अन्वये गुन्हा दाखल करून, पुढील तपास करीत आहे.