कुही :- पो.स्टे. कुही परिसरात फिर्यादीची पत्नी वय ४३ वर्ष व एक मुलगा व एक मुलगी असा त्याचा परीवार असुन फौर्यादीची पत्नी ही बचत गटाची सदस्य असुन बचत गटातील इतर महीलांकडुन पैसा जमा करीत असते. घटना वेळी व ठीकाणी फिर्यादीची पत्नी ही फिर्यादीच्या स्वतःच्या परमात्मा पशु खादय व किराणा दुकान येथे हजर असताना दोन तीन महीला आरोपी क्र. १) व २ तसेच इतर असे फिर्यादीच्या दुकानामध्ये येवुन फिर्यादीच्या पत्नीला म्हणाले की तुमच्या बचत गटाचे पैशाचे व्यवहार बरोबर नाही तुम्ही आमचे पैसे कधी देणार आहे अजुनपर्यंत आमचे पैसे का परत केले नाही असे म्हणून फिर्यादीच्या पत्नीसोबत भांडण करून फिर्यादीच्या पत्नीला शिवीगाळ करून मारण्याची धमकी देवून चारचाकी वाहनात जवरदस्तीने बसवुन घेवुन गेले. त्यावेळी दुकानाचे किरायदार मालक व त्याची पत्नी हजर होते व तिला म्हणत होते की तुम्ही येथून निघुन जा असे म्हणुन त्यांनासुध्दा धक्का दिला. फिर्यादीच्या पत्नीकडे असलेला मोबाईल नंबर सुध्दा बंद स्थिीतीत आहे.
सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. कुही येथे आरोपीतांविरुध्द कलम ३६३, ५०४, ५०६, ३४ भादंवी कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष डोलीकर पोस्टे कुही हे करीत आहे.