सिहोरा शेतात १२ फुटाच्या अजगर सापाला पकडुन जिवनदान दिले

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– वाईल्ड अँनिमल अँण्ड नेचर रेस्क्यु बहुद्देशीय संस्था सदस्यांची मौलिक कामगिरी. 

कन्हान :- नगर परिषद अंतर्गत सिहोरा या गावातील संजय ठकरेले यांच्या शेतात एक अजगर प्रजातीचा १० ते १२ फुटाचा साप आढळल्याने वाईल्ड अँनिमल अँण्ड नेचर रेस्क्यु बहुद्देशीय संस्था नागपुरच्या सदस्यांनी त्यास रेस्क्यु करून सापाला सुखरूप पकडुन वन विभागाच्या स्वाधिन करून निसर्गातील जंगलात मुक्त वास्तव करण्यास सोडले.

बुधवार (दि.२६) जुन २०२४ रोजी सकाळी ९ वाजता नगरपरिषद कन्हान-पिपरी अंतर्गत सिहोरा गावातील संजय ठकरेले यांच्या शेतात एक अजगर प्रजातीचा १० ते १२ फुट लांब साप आढळुन आल्याने शेतक-यांनी त्याची माहिती वाईल्ड अँनिमल अँण्ड नेचर रेस्क्यु बहुद्देशीय संस्था नागपुर च्या सदस्यांना दिल्याने संस्थेचे सदस्य रोहित शिंदे, वैभव लक्षणे, राजकुमार बावने, बंटी हेटे व विशाल इंगळे यांनी त्वरित घटनास्थळी पोहोचुन मानव वास्तवात आलेल्या त्या अजगर सापाला सुखरूप पकडुन मनसर माहुली वन विभागाच्या जंगलात निसर्ग मुक्त वास्तवा करिता सोडुन अजगर सापाला जिवनदान देत मौलिक कार्य केल्याबद्दल सिहोरा येथिल शेतक-यांच्या वतीने आणि कन्हान परिसरातुन वाईल्ड अँनिमल अँण्ड नेचर रेस्क्यु बहुद्देशीय संस्था सदस्याचे कौतुक करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एंसबा येथिल नितीन ठाकरे हत्ये प्रकऱणी दोन आरोपीना अटक

Fri Jun 28 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – दोन्ही आरोपीचा सखोल तपासा करिता ५ दिवसाचा पीसीआर कन्हान :- एंसबा येथिल नितीन ठाकरे याच्या हत्ये प्रकरणी पारशिवनी पोलीस निरिक्षक राजेशकुमार थोरात यानी फिर्यादी वडील खुशाल ठाकरे यांचे तक्रारीवरून अप क्र २४१/२०२४ कलम ३०७ अन्वये अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करित तपास करित पारशिवनी पोलीसानी आरोपी जागेश्वर ठाकरे व नागपुर ग्रामिण स्थागुअ शाखा पथकाने आरोपी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com