उत्तम शेवडे कांशिरामरत्न पुरस्काराने सन्मानित

संदीप कांबळे, कामठी

कामठी ता प्र 2: – बहुजन समाज पार्टीचे मा महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी, प्रदेश कार्यालय सचिव व बसपा चे जेष्ठ नेते उत्तम शेवडे यांना बसपाचे राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी राज्यसभा खासदार डॉ अशोक सिद्धार्थ साहेब यांच्या हस्ते बहुजन नायक मान्यवर *कांशीरामरत्न* या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान महाराष्ट्र प्रदेश बसपाच्या वतीने वाशीम येथे आयोजित फुले-आंबेडकर जयंती समारोहात देण्यात आला.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश बसपा चे प्रभारी प्रमोद रैना, नितीन सिंग, सुनील डोंगरे, मनिष कावळे, प्रदेश अध्यक्ष संदीप ताजणे, प्रदेश उपाध्यक्ष चेतन पवार, प्रदेश कोषाध्यक्ष महेंद्र रामटेके, प्रदेश महासचिव दादाराव उईके, प्रा रविंद्र गवई, दिगंबर ढोले, प्रदेश सचिव रंजनाताई ढोरे, अविनाश वानखेडे, प्रभात खिल्लारे, राष्ट्रीय प्रबोधनकार राहुल अनविकर प्रामुख्याने मंचावर उपस्थितीत होते.

उत्तम शेवडे हे 1980 पासून डीएस-फोर च्या माध्यमातून कांशीरामजी यांच्या चळवळीशी जुडले आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या मान्यवर कांशीराम सार्वजनिक वाचनालयात त्यांच्याकडे कांशीरामजींचे व त्यांच्या कार्यावरील 1971 पासूनचे सर्व प्रकाशित साहित्य उपलब्ध आहे.

उत्तम शेवडे हे बसपाच्या वतीने दक्षिण नागपूर विधानसभेची निवडणूक 1999 व 2009 ला लढले. 1999 ला निवडणूक प्रचारासाठी स्वतः कांशीरामजी आले होते. नागपुरात 13 व 14 ऑक्टोंबर 2002 ला झालेल्या आरक्षण शताब्दी महोत्सवात उत्तम शेवडे यांनी लावलेल्या बहुजन साहित्य प्रदर्शनी चे कांशीरामजींनी स्वतः उद्घाटन करून शेवडेंचा गौरव केला होता.

उत्तम शेवडे हे बसपाचे मीडिया प्रभारी म्हणून मागील तीस वर्षापासून काम पहात आहेत. सोबतच महाराष्ट्र प्रदेश कार्यालय सचिव व प्रवक्ते म्हणूनही कार्य केलेले आहे. उत्तम शेवडे यांनी मान्यवर कांशीराम रायटींग एन्ड स्पीचेस या नावाने 2010 ला एक पुस्तक संपादित करुन प्रकाशित केलेली आहे. उत्तम शेवडे ह्यांनी डॉ आंबेडकर विचारधारा व बौद्ध अध्ययन मध्ये एम ए केलेले आहे. हल्ली ते महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीत कांशीरामजी यांचे योगदान या विषयावर नागपूर विद्यापीठात *पीएच डी* करीत असून पाली भाषा मध्ये सुद्धा एम ए करीत आहेत.

उत्तम शेवडे ह्यांना बसपातील सातत्यपूर्ण कार्यामुळे मिळालेल्या कांशीरामरत्न ह्या पुरस्काराने फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत तसेच बसपात कार्य करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी शेवडे ह्यांचे अभिनंदन केले आहे. तर कामठी शहरातुन बसपा चे पदाधिकारी किशोर गेडाम,अनिल कुरील, नितीन सहारे, रवी मधूमटके, गीतेश सुखदेवें , विकास रंगारी, मनोज रंगारी, संतोष मेश्राम आदींनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही -पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांची ग्वाही

Mon May 2 , 2022
भंडारा : स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या मार्फत ग्रामीण भागातील विकास योजना राबविल्या जातात. ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासक प्रतिपादन पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी आज केले. आज “हीरक महोत्सव समारंभ” जि. प. भंडाराचे सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्या स्थापनेस 60 वर्षे पूर्ण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!