डॉ आंबेडकर जयंती निमित्य भव्य दिव्य महारैली, जय घोषाने दुमदुमली कन्हान नगरी.
कन्हान : – डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या १३१ जयंती प्रित्यर्थ डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समि ती कन्हान व्दारे भिम गित, प्रबोधन, भोजनदान व सम ता सैनिक दलाचे पथसंचालन, लेझिम पथक, कराटे संघ, दान पट्टा, अखाडा, डि जे वर नृत्य, रोशनाई रथ, फटाक्यांची आतिषबाजी सह भव्य दिव्य महारैलीने ३ दिवसीय भिम मोहोत्सव हर्षोउत्साहात थाटात साजरा करण्यात आला.
बुधवार (दि.१३) एप्रिल ला पहिल्या दिवसी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे पुर्व संध्येवर गायक नरेश चिमणकर सह चंमुनी प्रसिध्द भीम गीत गाऊन उपस्थिताना मंत्रमुग्ध करित प्रबोधनात्मक कार्य क्रम सादर केला. रात्री १२ वाजता डॉ बाबासाहेब आं बेडकरांना मानवंदना व मोठा केक कापुन आकाशात फटाक्याची आतिषबाजी करून भीम महोत्सवाची सु रूवात करण्यात आली. गुरूवार (दि.१४) एप्रिल ला दुस-या दिवसी सकाळी ११ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास माल्यार्पण व बुद्ध वंदना करून विन्रम अभिवादन करण्यात आले. सायंकाळी ७ वाजे पासुन सिध्दार्थ कॉलनी, कन्हान बौद्ध विहार परिसरात भव्य भोजनदान करण्यात आले. (दि.१५) एप्रिल तिस-या दिवसी सांयकाळी ७ वाजता पंचशील नगर सत्रापुर येथुन डॉ बाबासाहेब आंबेडकर, रमाई यांचे वेशभुषा करून जिवीत रूपी सुशोभित झाकी काढुन गौतम बुध्द, महात्मा जोतीराव फुले, सावित्री फुले, भिमा कोरेगाव विजय स्तंभ च्या तैलचित्रा सह समता सैनिक दल चंमु, लेझिम पथक, कराटे संघ, दान पट्टा, अखाडा, रोशनाई रथ, डि जे धुन वर तरूण व तरूणीचे नृत्य, फटाक्यांची आतिषबाजीने भव्य दिव्य महारैली पंचशीलनगर सत्रापुर पासून महामार्गाने ना का नं ७ पर्यंत लांबच लांब महारैलीत डॉ आंबेडकरां च्या जय घोषाने कन्हान नगरी दुमदुमुन हर्षोउत्साहात तीन दिवसीय भीम जयंती महोत्सव थाटात साजरा करण्यात आला. महोत्सवाच्या यशस्वितेकरिता डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समिती कन्हान चे प्रमुख सदस्य प्रशांत वाघमारे, सतिश भसारकर, रिंकेश चौरे, शैलेश माटे, निखिल रामटेके, अभिजित चांदूरकर, पंकज रामटेके, मयुर माटे, दिनेश नारनवरे, महेश धोंगडे, योगेंद्र (बाबु) रंगारी, सोनु गजभिये, सिध्दार्थ ढोके, सुमित नितनवरे, लाला गजभिये, विक्की उके, संजय चंहादे, गौतम नितनवरे, मोंटी राऊत, अशोक नारनवरे, सुशिल कळमकर आदीने सहकार्य केले तर विशेष सहकार्य राजेन्द्र शेंदरे,दिपचंद शेंडे, सारिका धारगावे, राजकुमार चोपकर, तृप्ती शेंडे, नितिन उके, अतुल ढोके यांचे लाभले.