संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 3:-आज 3 एप्रिल रविवार पासून मुस्लिम बांधवांचे पवित्र पर्व मानले जाणारे रमजान महिन्याला शुभारंभ झाला असून या पवित्र रमजान महिन्यातले रोजे सुरू झाले आहेत. या महिन्यात मुस्लिम बांधव , महिला , युवक, युवती सह अनेकजण आपापल्या परीने रोजे पकडीत असतात .या महिन्यात मुस्लिम बांधव अल्लाहची ईबादत करतात.दिवसभर काही न खाता व पाणी न पिता रोजे धरतात दिवस मावळल्यावर मशिदीत एकत्र येऊन अल्लाहचे नमाज अदा केल्यानंतर रोजा सोडतात तर सकाळी सूर्य निघण्याआधी आपली सर्व कामे आटोपून आपले भोजन आटोपतात.या पवित्र महिन्यात फक्त मुस्लिम बांधव आपले विविध धार्मिक कार्य त्यांच्या रितिरिवाजप्रमाणे पार पाडतात.
आजपासून मुस्लिम समुदायाच्या रमजान महिन्याच्या धार्मिक सणोत्सवाला सुरुवात
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com