नागपूर : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाद्वारे दिव्यांगांसाठी एडीआयपी योजना आणि ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत मोफत सहायक साधने वाटपासाठी मंगळवार २२ मार्च पासून रेशिमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये सकाळी १० वाजेपासून शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ३१ मार्च पर्यंत हे शिबिर असून यामध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांची तपासणी करण्यात येणार आहे.
समेकीत क्षेत्रीय कौशल्य विकास, पुनर्वास एवं दिव्यांगजन सशक्तीकरण केंद्र, (दिव्यांगजन), (सी.आर.सी–नागपूर) एएलआयएमसीओ, जिल्हा प्रशासन, जिल्हा समाजकल्याण, जिल्हा परिषद, नागपूर आणि नागपूर महानगरपालिका यांच्या सहकार्याने दिव्यांग व्यक्तीकरिता एडीआयपी तपासणी शिबिर आणि राष्ट्रीय वयोश्री योजनेद्वारे ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक साहित्याच्या वाटपाकरिता शिबिरात नोंदणी व तपासणी केली जाईल. यासंदर्भात नागपूर महानगरपालिकेद्वारे झोन स्तरावर शिबिर घेण्यात आले होते.
मनपाच्या झोन निहाय तपासणी शिबिरामध्ये सहभागी होउ न शकलेल्या पात्र व्यक्तींनी २२ ते ३१ मार्च दरम्यान कविवर्य सुरेश भट सभागृहातील शिबिरात नोंदणी व तपासणी करून घ्यावी, असे आवाहन सी.आर.सी, नागपूरचे संचालक प्रफुल्ल शिंदे यांनी केले आहे.
दिव्यांगांसाठी आवश्यक कागदपत्रे / पात्रता
– जिल्हा प्रशासनातील सक्षम अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेले ४० टक्के किंवा त्याहून अधिक अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
– मासिक उत्पन्न १५ हजार किंवा त्यापेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक.
– पूर्ण पत्ता असल्याचा दाखला/आधार कार्ड
– दोन पासपोर्ट फोटो
वयोश्री योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्रे / पात्रता
– वय ६० वर्षापेक्षा जास्त
– वार्षिक उत्पन्न १ लाख ८० पेक्षा कमी
– आधार कार्ड
– उत्पन्नाचे प्रमाणपत्र /बी.पी.एल. कार्ड
– पासपोर्ट फोटा (४)