महिला दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते ‘कमला पॉवर विमेन पुरस्कार’ प्रदान

अभिनेत्री सुहास जोशी सन्मानित

मुंबई – आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील ३८ कर्तृत्ववान महिलांना मंगळवारी (दि. ८) येथे ‘कमला पॉवर विमेन’  पुरस्कार प्रदान करण्यात आले.

अभिनेत्री सुहास जोशी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. पुरस्कार सोहळ्याचे आयोजन अंकीबाई घमंडीराम गोवानी ट्रस्टतर्फे करण्यात आले होते. ट्रस्टच्या संस्थापिका निदर्शना गोवानी व रमेश गोवानी  व्यासपीठावर उपस्थित होते.

अंकीबाई घमंडीराम ट्रस्टच्या माध्यमातून निदर्शना गोवानी यांनी करोना काळात गरीब, महिला, कोविड योद्धे व उपेक्षितांची सेवा केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना महिला हे शक्तीस्वरूप असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

भारतात स्त्रियांचा सन्मान करण्याची परंपरा वेदकाळापासून असल्याचे सांगताना गार्गी, मैत्र्येयी, कात्यायनी, अरुंधती आदींच्या विद्वत्तेचा गौरव केला. देश पारतंत्र्यात गेल्यावर महिलाविरोधी अनिष्ट प्रथा आल्या. परंतु आज महिला सर्व क्षेत्रांत पुढे जात आहेत. महाराष्ट्रातील आदिवासी मुलींनी अलीकडेच माउंट एव्हरेस्ट देखील सर केले. देश संकटात असताना महिला पुनश्च शक्तिरूपा होऊन मदतीला धावून येतील असे त्यांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी चेतना सिन्हा, स्मिता थोरात, श्वेताली ठाकरे, कीर्ती चिंतामणी, रंजना कोळगे, पूनम चोक्सी, एलिझाबेथ एफ कट्टूक्करेन, प्रतिभा सांगळे, डॉ.जया महेश, पूजा उदेशी, शक्ती मोहन, सिमा टपरिया, विद्या भांडे, भावना जैन, रेखीव खान, प्रभात खान, स्मिता थोरात, विनिता साहू, गीता व्यंकटेश्वर, अलिशा सिंग , नीती मोहन, फरजाना दोहाडवाला, डॉ. रिश्मा पै, अधिवक्ता गौरी छाब्रिया , झैनाब जाविद पटेल , सिस्टर बर्टिला , सिस्टर लुसिया , नीती गोयल , डॉ महिमा बक्षी , डॉ ऋचा जैन, अनुपमा देवराजन , माधुरी मडावी, बिनाफर कोहली, श्वेता वर्धन, सुलोचना चव्हाण, मनीषा वाघमारे, पूनम गौरव बोरसे, संगिता दशरथ धनकुटे, समीरा गुजर यांना सन्मानित करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

Governor Koshyari presents 'Kamala Power Women Award 2022' to 38 women achievers

Tue Mar 8 , 2022
Mumbai – Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the ‘Kamala Power Women Award 2022’ to 38 women achievers from various walks of life at Raj Bhavan Mumbai on the occasion of International Women’s Day on Tuesday (8 Mar) The felicitation of women achievers was organised by the Ankibai Ghamandiram Gowani Trust. Theatre and film actor Suhas Joshi was among those felicitated […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!