महाराष्ट्र राज्य लॉटरी मासिक व साप्ताहिक सोडत

– बक्षीस पात्र तिकीट खरेदीदारांनी विहित प्रक्रिया पूर्ण करून बक्षीस मागणी करण्याचे आवाहन

मुंबई :- महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात पाच मासिक सोडती तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. महाराष्ट्र सहयाद्री, महाराष्ट्र गणेशलक्ष्मी माघी गणपती विशेष, महाराष्ट्र गौरव, महाराष्ट्र तेजस्विनी व महाराष्ट्र गजराज या मासिक सोडतीमध्ये ज्या तिकीट खरेदीदाराना बक्षीस जाहीर झाली आहेत त्यांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रुपये दहा हजारावरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी यांच्या कार्यालयाकडे करावी असे उपसंचालक (वित्त व लेख) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

महाराष्ट्र सहयाद्री या लॉटरीची सोडत ११ फेब्रुवारी २०२५ रोजी, महाराष्ट्र गणेशलक्ष्मी माघी गणपती विशेष  लॉटरीची सोडत १५ फेब्रुवारी २०२५,  महाराष्ट्र गौरव लॉटरीची सोडत१९ फेब्रुवारी २०२५ रोजी, महाराष्ट्र तेजस्विनी लॉटरीची सोडत २१ फेब्रुवारी २०२५ रोजी तर महाराष्ट्र गजराज लॉटरीची सोडत २५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता काढण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र सह्याद्री तिकीट क्रमांक MS-२५०२ D /४१३८९१ या सिद्धी समर्थ एजन्सी, दादर, मुंबई यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू.११ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे. महाराष्ट्र गणेशलक्ष्मी माघी गणपती तिकीट क्रमांक GS०१ / ७१९१ या प्रिंन्स लॉटरी सेंटर, कल्याण यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू.२२ लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर झाले आहे. महाराष्ट्र तेजस्विनी तिकीट क्रमांक TJ-०८ / ५७०४ या कोमल एजन्सी, छत्रपती संभाजीनगर यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू.२५ लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर झाले आहे. महाराष्ट्र गजराज तिकीट क्रमांक GJ००/४२०० या सिद्धी समर्थ एजन्सी, दादर, मुंबई यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू.१४ लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर झाले आहे. तसेच महाराष्ट्र सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी या साप्ताहिक सोडतीमधून रक्कम रू. ७ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एकूण ९ बक्षिसे जाहीर झाली आहेत.  याशिवाय फेब्रुवारी २०२५ मध्ये मासिक व भव्यतम सोडतीतून १४८५६ तिकीटांना रू. १,०७,०३,०००/- व साप्ताहिक सोडतीतून ५४,२६१ तिकीटांना रू. २,१७,४२,६००/- ची बक्षिसे जाहीर झाली आहेत.

सर्व तिकीट खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम रूपये १० हजार वरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाय, ए-वन,अतिरिक्त शॉप कम गोडाऊन, एपीएमसी मार्केट, सेक्टर -१९ बी, वाशी, नवी मुंबई या कार्यालयाकडे सादर करावी.  दहा हजार रुपयांच्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असेही प्रसिद्धी पत्रकार उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा  ‘स्टॅचू ऑफ वुमन एम्पॉवरमेंट’ उभारावा - सभापती प्रा.राम शिंदे

Sat Mar 8 , 2025
मुंबई :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चोंडी येथील जन्मस्थानाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत असून गुजरात मधील ‘स्टॅचू ऑफ युनिटी’ प्रमाणे चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या ‘स्टॅचू ऑफ वुमन एम्पॉवरमेंट’ पुतळा उभारण्याबाबत तसेच त्यांच्या प्रेरक जीवन कार्याची माहिती येणाऱ्या पिढ्यांना व्हावी, या दृष्टीने संग्रहालय बनविण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार असल्याचे विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!