कोदामेंढी: पं. स. मौदा, गट ग्रामपंचायत तुमान – तरोडी अंतर्गत येणाऱ्या शिवाजीनगर येथे सरपंच तथा मौदा तालुका सरपंच संघटना अध्यक्ष धम्मजीत परसराम गजभिये यांच्या वाढदिवसाचा केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला.
वाढदिवस साजरा केल्याबद्दल सरपंच धम्मजीत गजभिये यांनी तंटामुक्ती उपाध्यक्ष गोपाल येंडापल्ली, तंटामुक्ती अध्यक्ष विकास चौधरी, मुकेश उईके, उपसरपंच धीरज बरबटे, ग्रामपंचायत सदस्य तेजस्वीनी उईके, रमा नर्रा, दुर्गेश, विजय, हरिदास, अशोक, सत्यनारायण, साईबाबू व समस्त शिवाजीनगर ग्रामवासी यांचे मनापासून आभार मानले आहेत.