सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 45 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 51 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरूवार (28) रोजी शोध पथकाने 45 प्रकरणांची नोंद करून 28,900/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून 3,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 200/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 17 प्रकरणांची नोंद करून 18,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 13 प्रकरणांची नोंद करून 2,600/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 4 प्रकरणांची नोंद करून 4,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे. किशोर बोरकर यांनी सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रु. 5,000/- रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. तसेच मे. कॅफे कोरियानो यांनी दुकानातील कचरा जवळच्या रस्त्याच्या कडेला टाकल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. हनुमान नगर झोन अंतर्गत मे. श्यामसुंदर रेसिडेन्सी यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. समर्थ पंतग शॉप यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच मे. रिझवान स्टोअर्स यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. भिसीकर प्लास्टिक यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. उपद्रव शोध पथकाने 5 प्रकरणांची नोंद करून रू. 35,000/- दंड वसूल केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दत्तक इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी - जिल्हाधिकारी संजय दैने यांचे आवाहन

Fri Nov 29 , 2024
गडचिरोली :- बाल न्याय अधिनियमाची पुर्तता न करता दत्तक विधान केल्यास संबंधित व्यक्ती ३ वर्षापर्यंत कैद किंवा ०१ लाख रुपयापर्यत दंड किंवा दोन्ही शिक्षेस पात्र ठरेल तसेच कोणत्याही उद्देशाने बालकांची विक्री किंवा खरेदी केल्यास अशा व्यक्तींना ०५ वर्षापर्यंत सश्रम कारावास आणि ०१ लाख रूपयांपर्यत दंडाची शिक्षेचे प्रावधान असल्याने दत्तक इच्छुक पालकांनी कायदेशीररित्या दत्तक विधानाची प्रक्रिया पुर्ण करून दत्तक विधान करण्याचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!