गोरेवाड्यातील वन्य प्राणी अधिवासाचे प्रश्न प्रथम हाताशी घेणार 

– पश्चिम नागपुरकरांच्या सुरक्षेसाठी विकास ठाकरेंची ग्वाही

नागपुर :- पश्चिम नागपुराच्या लगत असलेल्या गोरेवाडा जंगल आणि त्या सभोवतालचा परिसर हा हिरवळ व झुडपी गवतांनी वेढलेला आहे. त्यामुळे बिबट्यांचा अधिवास शहरांबाहेर असला तरीही अधूनमधून शहरातील मानवी वस्तींकडे त्यांनी आपला मोर्चा वळविल्याचे काही वर्षभरांपासून दिसत आहे. त्यामुळे या परिसरात असणाऱ्या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या या महत्त्वाच्या प्रश्नाला आपण प्रथम हाताशी धरून गोरेवाडा जंगलातील सुरक्षा भिंतीची उंची वाढविण्यासाठी व फेन्सिंग लावण्यासाठी आरखडात तयार करणार तसेच वर्षभरात याचे काम पूर्ण करण्याचा आपला निर्धार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रका द्वारे पश्चिम नागपुरचे विद्यमान आमदार, नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिली.

जन-आशीर्वाद यात्रेत सोमवारी एका छोटेखानी सभेत विकास ठाकरे म्हणाले की, पश्चिम नागपुरात येणाऱ्या गोरेवाडा, झिंगाबाई टाकळी, अंबाझरी, आयटीपार्क, व्हीएनआयटी, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ विश्रामगृह परिसर ते थेट महाराजबाग प्राणीसंग्रहालयापर्यंत या भागात बिबट्याचे वास्तव्य अनेक वर्षांपासून आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण विशेष आराखडा तयार करून निराकारण काढण्याचा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.

पश्चिम नागपुर मतदारसंघातील समस्यांचा बारकाईने अभ्यास केल्याने जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता मी पाच वर्षात करू शकलो. जनतेने माझ्यावर विश्वास दाखविला आणि मीदेखील संपूर्ण मतदारसंघातील रस्ते, वीज, पाणी व आरोग्य आदी महत्त्वाचे प्रश्न गेल्या पाच वर्षांत सोडविले. आरोग्य क्षेत्रात गोरगरिबांच्या मुलांवरील खर्चाची जबाबदारी उचलत जनसेवेत तत्परतेने मला काम करण्याची संधी मिळाली. यामुळे पश्चिम नागपुर मतदारसंघात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेकडून मिळत असल्याने आपण या मतदारसंघात दुसऱ्यांदा विजयाचा इतिहास घडवू असेही विकास ठाकरे यावेळी म्हणाले.

ठाकरेंचा पश्चिम नागपुरच्या चौफेर विकासावर भर: माजी आमदार प्रकाश गजभिये

गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात विद्यमान आमदार विकास ठाकरेंनी केवळ आणि केवळ विकासाला प्राधान्य दिले. ठाकरेंची काम करण्याची शैली ही भविष्यात आपल्याला मतदारसंघाचे विकासाभिमूख कायापालट करण्यासाठी प्रतिबद्ध आहे. त्यामुळे पश्चिमच्या सर्वांगिण विकासाचे चित्र बदलण्यासाठी मतदारांनी पुन्हा एकदा विकास ठाकरेंच्या पाठीशी उभे राहून त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे मतदारांना आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी आमदार माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी केले. गजभिये यांनी सांगितले की, महाविकास आघाडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहरातील सर्व कार्यकर्ते त्यांच्या प्रचारार्थ लागले आहे. त्यामुळे ठाकरेंच्या गळ्यात पुन्हा विजयाची माळ पडणार हे निश्चित झाल्याचेही माजी आमदार प्रकाश गजभिये म्हणाले.

 जन-आशीर्वाद यात्रेत मविआ कार्यकर्त्यांचे शक्ती-प्रदर्शन

महाविकास आघाडीचे पश्चिम नागपुरचे लोकप्रिय उमेदवार विकास ठाकरेंच्या जन-आशीर्वाद यात्रा सोमवारी सायंकाळी पाचच्या सत्रात आर. एस. मुंडले कॉलेजच्या मागे काचीपुऱ्यातून काढण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येत प्रचारार्थ उपस्थित होते. यावेळी विकास ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत करून जन-आशीर्वाद यात्रेला प्रारंभ झाला. यानंतर पुढे केएचबी कॉलोनी, काचीपुरा पोलिस चौकी, नंदाजी बाबा मंदीर, रामदासपेठ, लेंड्रा बस्ती, फार्म लॅन्ड परिसर, दगडी पार्क मार्गाने बॅरिस्टर. शेषराव वानखेडे शाळा परिसरात यात्रेचा समारोप झाले. यावेळी पश्चिम क्षेत्रातील महिला, पुरुष, तरुण विकास ठाकरे यांच्या स्वागतासाठी जागोजागी रस्त्यावर दिसून आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उमरखेडमध्ये 249 दिव्यांग व जेष्ठांनी घरीच केले मतदान

Wed Nov 13 , 2024
उमरखेड :- वयवर्ष 85 व दिव्यांग मतदारांचे मतदानाचे प्रमाण वाढावे तसेच या मतदारांना घरीच मतदानाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी आयोगाच्या निर्देशाप्रमाणे अशा मतदारांचे घरीच मतदान घेतले जात आहे. उमरखेड विधानसभा मतदारसंघात 249 मतदारांच्या घरी जावून पथकाच्यावतीने त्यांचे मतदान घेण्यात आले.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/11/WhatsApp-Video-2024-11-13-at-13.36.19_a6cf01ac.mp4 निवडणूक आयोगाच्या निर्देशनुसार 85 वर्षावरील वयोवृद्ध व दिव्यांग नागरिकांच्या घरी जाऊन मतदान घेण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार उमरखेड विधानसभा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com