पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

– दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मंगळवारी रात्री 8.00 वाजता

– समाज माध्यमावर रात्री 8.00 वाजता मुलाखतीचे प्रसारण

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024’ आणि ‘समाज माध्यमांची भूमिका’ या विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे. समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्या नागरिकांनी लोकशाहीला बाधा निर्माण होणार नाही यासाठी जबाबदारीने हे माध्यम हाताळण्याबाबत या कार्यक्रमात सायबर क्राईम विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांनी माहिती दिली आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात शिंत्रे यांची मुलाखत मंगळवार दि. 5 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 8.00 रात्री वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरील पुढील लिंकवर ऐकता येणार आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यूट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRA DGIPR

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत ‘सायबर क्राईम विभागाची भूमिका आणि समाज माध्यमे हाताळताना घ्यावयाची काळजी’ याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत खबरदारी घेण्यात येत आहे. आचारसंहितेच्या काळात समाज माध्यमांवरून नियमांचे उल्लंघन होणार नाही, फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स इत्यादी माध्यमांवरून आक्षेपार्ह पोस्ट, तथ्यहीन माहिती पसरणे, निवडणूक प्रक्रियेत बाधा निर्माण करणे इत्यादीबाबत कोणती नियमावली जाहिर करण्यात आली आहे, याबाबत पोलीस उपमहानिरीक्षक शिंत्रे यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पुण्यात धक्कादायक घटना, निवडणूक अधिकाऱ्याची कारच पेटवली, सर्वत्र खळबळ

Mon Nov 4 , 2024
पुणे :- पुण्यातील चिंचवड विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याची चारचाकी वाहन एका दिव्यांग व्यक्तीने आग लावून पेटवून दिली आहे. सोपान ओव्हाळ असं या व्यक्तीचं नाव आहे. दिव्यांग सोपान ओव्हाळ यांनी 15 ऑगस्टला महापालिका आयुक्त शेखर सिंग यांच वाहन देखील फोडण्याचा प्रयत्न केला होता. दिव्यांग सोपान ओव्हाळ यांनी काही दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाकडे रसवंती गुर्हाळ आणि रमाई आवास योजनेच घरकुल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com