संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या 20 नोव्हेंबरला कामठी मौदा विधानसभा मतदार संघाची सार्वत्रिक निवडणूक होणार असून त्यानुसार 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर पर्यंत कामठी तहसील कार्यालय सभागृहात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे इच्छुक उमेदवारांनी पक्ष व अपक्ष असे एकूण 29 उमेदवारांनी 33 उमेदवारी अर्ज सादर केले आहेत.त्यानुसार कामठी मौदा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 58 कामठी विधानसभा मतदार संघाकरिता प्राप्त उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्राची छाननी आज दिनांक 30 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी 58 कामठी विधानसभा मतदार संघ यांचे सभागृहात निवडणूक निरीक्षक सुनील कुमार तसेच उमेदवार/प्रस्तावक/प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.दरम्यान प्राप्त नामनिर्देशन पत्राची संक्षिप्त छाननी प्रक्रिया पार पाडावी व सदर छाननी प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना निवडणूक निरीक्षक सुनील कुमार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गोसावी यांना दिले. याप्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार गणेश जगदाडे, नायब तहसीलदार उपेश अंबादे,नायब तहसीलदार मयूर चौधरी उपस्थित होते.