विद्युत खांब व तारांवरील झुडूपे तोडण्यासाठी सरपंच माणसं देत नाही – लाईनमन उईके 

– सुरु झाली दिवाळी तरी विद्युत खांबावर पथदिवे उन्हाळ्यापासून बंद 

कोदामेंढी :- सोमवार 28 ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या दिवाळी सणानिमित्त नागरिक घरासमोरील पोजवर व घराभोवताली लाइटिंग लावून घर परिसर उजळून काढीत आहे. मात्र गेल्या मार्च महिन्यापासून म्हणजेच उन्हाळ्यापासून म्हणजेच सरपंच गावात मुक्कामी राहत नसल्यापासून सावंगी रोडवरील विद्युत खांब व तार वाढलेल्या झुडपांमुळे दिसेनासे झाले आहेत व तुटण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत येथील लाईनमन उईके यांना भ्रमणध्वनी वरून व प्रत्यक्षात भेटून मागील पंधरा दिवसांपूर्वी पासून दोनदा विचारपूस केली असता ते पोल फक्त दिवाबत्ती लावण्यासाठी असून त्याच्या देखभाल ग्रामपंचायत कडे राहते ते वितरण कंपनीचे काम नसल्याचे त्यांनी सांगितले. माझे काम लाईन बंद करून देणे असून मी लाईन बंद करून देण्यास तयार आहे .परंतु सरपंच आशिष बावनकुळे झुडपे तोडण्यासाठी वारंवार मागणी करूनही माणसं नसल्याचे सांगत आहे . त्यामुळे दिवाळी सुरू झाल्यानंतरही सावंगी रोडावरील खांब व तारांवर मोठ्या प्रमाणात झुडपे वाढल्याने पथदिवे बंद निकामी झाल्याने नवीन पथदिवे लावता येत नाही. त्यामुळे परिसरातील सावंगी रस्त्यावरील पुलावर अंधार असल्याचे उईके यांनी मान्य केले.

पथदिवे खरेदी प्रकरणी तीन लाख 88 हजार 474 रुपयाच्या घोटाळा करण्यासाठी सरपंच आशिष बावनकुळे ? यांच्याकडे डोकं आहे. परंतु दिवाळी सुरू झाली तरी विद्युत खांब व तारांचे झुडपे तोडून पथदिवे लावण्यासाठी खरोखरच माणसे नाहीत का ?असा संतप्त सवाल सावंगी रस्त्यावर पहाटे व सायंकाळी आवागमन करणाऱ्या नागरिकांनी प्रशासनासमोर मांडला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शहरातील ५९ पुतळ्यांची सखोल स्वच्छता

Wed Oct 30 , 2024
– मनपाच्या अभिनव उपक्रमाला नागरिकांकडून कौतुकाची थाप! नागपूर :- स्वच्छ, सुंदर आणि हरित नागपूर साकारताना शहरातील विविध चौक, महापुरुषांचे पुतळे, स्मारके स्वच्छ दिसणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ अभियाना अंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे पहिल्यांदाच सामूहिकरीत्या शहरातील विविध ५९ पुतळे, स्मारक, चौकांची सखोल स्वच्छता करण्यात आली. या अभिनव उपक्रमाला नागरिकांनी देखील उत्तम प्रतिसाद दर्शवित मनपाच्या कार्याचे कौतुक केले. मनपा आयुक्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com